महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये पतीच्या अनैतिक संबंधास कंटाळून पत्नीने केली आत्महत्या - Deepali Dhaval suicide case nanded

शहरातील बऱ्याम सिंगनगरमधील नंदी महाराज मंदिरासमोर गव्हाणे मुखेडकर यांचा वाडा आहे. या वाड्यात भगवान ढवळे व त्याची पत्नी दीपाली भगवान ढवळे हे दोघे पती-पत्नी राहत होते. पतीचे अमरावतीच्या बडनेरा येथील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे दीपालीने १३ जानेवारीला राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

nanded
विमानतळ पोलीस ठाणे नांदेड

By

Published : Jan 16, 2020, 11:00 AM IST

नांदेड -पतीचे अन्य महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधाला कंटाळून शहरात एका विवाहितेने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती व त्याचे अनैतिक संबंध असलेल्या महिलेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील बऱ्याम सिंगनगरमधील नंदी महाराज मंदिरासमोर गव्हाणे मुखेडकर यांचा वाडा आहे. या वाड्यात भगवान ढवळे व त्याची पत्नी दीपाली भगवान ढवळे हे दोघे पती-पत्नी राहत होते. पतीचे अमरावतीच्या बडनेरा येथील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. दीपालीने पतीला त्या बाईचा नाद सोडण्याचा तगादा लावला. मात्र, तिचे पती भगावान ढवळे व त्या महिलेने ते झुगारले. त्यामुळे दीपालीने १३ जानेवारीला राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. याबाबत अशोक जावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवर विमानतळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६/२०२० कलम ४९८ (अ), ३०६(अ), ३४ या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स.पो.नि जाधव पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा-संतप्त शेतकऱ्यांनी फोडले नांदेड साखर सहसंचालकाचे कार्यालय

ABOUT THE AUTHOR

...view details