महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची सरकारला सद्बुद्धी दे; मनोज जरांगे पाटील यांनी घातलं रेणुका मातेला साकडं

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी आज माहुर येथील श्री रेणुका मातेचे दर्शन (Renuka Mata) घेत विधीवत पूजा करुन आरती केली. मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची सरकारला सद्बुद्धी दे असं साकडं देवीला घातल्याचं (Manoj Jarange Patil) जरांगे पाटील यांनी सांगितलं.

Manoj Jarange Patil News
मनोज जरांगे पाटील यांनी घेतले रेणुका मातेचे दर्शन

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 8:56 PM IST

मनोज जरांगे पाटील यांनी घेतले रेणुका मातेचे दर्शन

नांदेड Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील नांदेड दौरावर आहेत. आज त्यांनी माहुर येथील श्री रेणुका मातेचं (Renuka Mata) दर्शन घेतलं. विधीवत पूजा करुन जरांगे पाटील यांनी श्री रेणुका मातेची आरती केली. आवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यांना जास्तीची मदत देण्याची सद्बुद्धी दे असं साकडं आईच्या चरणी घातल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. रेणुका मातेचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुन्हा लढायला सज्ज झाल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं.

दोन दिवसातच मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा: उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. तेव्हा सरकारनं 24 डिसेंबर येऊं देऊ नये, राज्यात ज्या नोंदी सापडल्या त्याचा अहवाल सरकारने स्वीकारावा आणि या दोन दिवसातच मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा अशी सरकारला विनंती करण्यात आली आहे.


मराठ्यांचं वाटोळं व्हावं हे त्याचं स्वप्न :छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा रोष मराठ्यांवर आहे. मराठे मोठे होऊ नये हा त्यांचा पूर्वीपासून आकस आहे. मराठ्यांचं वाटोळं व्हावं हे त्याचं स्वप्न आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्याचं स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, त्यांचा मुकाबला करण्यास आम्ही समर्थ आहोत असे जरांगे पाटील म्हणाले.

कुणबी दाखल्याचं वितरण : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण केल्यानंतर, राज्य सरकार जोमानं कामाला लागलय. सरकारनं कुणबी प्रमाणपत्रासाठी (Kunbi Certificate) राज्यभर मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळं सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द आल्या होत्या. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सुरू केलेल्या आंदोलनानंतर राज्यभरात कुणबीच्या नोंदी तपासणीला सुरुवात झाली आहे. सोमवारी सायंकाळी कराड तालुक्यातील पहिल्या कुणबी दाखल्याचं वितरण प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे (Atul Mhetre) आणि तहसीलदार विजय पवार यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. "मला अटक झाली की कळेल मराठा समाज काय आहे", मनोज जरांगेंचा सरकारला गर्भित इशारा
  2. आमच्याशी दगाफटका करु नका नाहीतर जड जाईल; मनोज जरांगे पाटलांचा इशारा
  3. भुजबळांकडून जातीय तेढ होणारी भूमिका, सरकारची तीच भूमिका आहे का-मनोज जरांगे पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details