नांदेड - परतीच्या पावसाने मनार धरण शंभर टक्के भरले असून, धरणालगतच्या चार गावांना धोका निर्माण झाला आहे. पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
परतीच्या पावसाने मनार धरण ओव्हफ्लो, चार गावांना धोका - मनार धरण
परतीच्या पावसाने मनार धरण शंभर टक्के भरले असून, धरणालगतच्या चार गावांना धोका निर्माण झाला आहे. पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मनार धरणातून पाण्याचा विसर्ग चालू असून, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कंधार, मुखेड, नायगाव, बिलोली आणि धर्माबाद या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना हे भरल्याने फायदा होणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून हे धरण न भरल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
सध्या या धरणातून पाण्याचा विसर्ग चालू असून, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान कंधार तालुक्यातील अनेक गावांत गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे.