महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेहुणीला फोन करून त्रास देतो म्हणून 'त्याला' केले ठार - accuse

जिल्ह्यातील उमरी (ता. अर्धापूर) येथील देविदास बारसे या बेपत्ता असलेल्या तरुणाचा खून झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अवघ्या २५ तासात या प्रकरणाचा छडा लावत संशयित मारेकऱ्याला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.

By

Published : Feb 1, 2019, 11:54 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील उमरी (ता. अर्धापूर) येथील देविदास बारसे या बेपत्ता असलेल्या तरुणाचा खून झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अवघ्या २५ तासात या प्रकरणाचा छडा लावत संशयित मारेकऱ्याला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. मेहुणीला फोन करून त्रास देत होता म्हणून त्याला ठार केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे.

अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील रहिवासी देवीदास दत्तराम बारसे (४०) हे २१ जानेवारी रोजी सायंकाळी नातेवाईकाला उपचारासाठी नांदेडला घेऊन गेले होते. नातेवाईकाला रुग्णालयात दाखल करुन ते गावी जातो म्हणून निघाले. मात्र, ते गावाकडे परतले नाहीत. नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर अर्धापूर पोलीस ठाण्यात प्रकाश बारसे यांनी देवीदास बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाला नांदेड शहरातील डंकीन भागातील नाल्यात छिन्नविच्छिन्न स्थितीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. हा फोटो सोशल मीडियातून व्हायरल केल्यानंतर ही मृत व्यक्ती देवीदास असल्याची ओळख पटली.

घटनेची माहिती मिळताच शहर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, वजिराबादचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. देवीदास बारसे यांचा खून झाल्याचा निष्कर्ष पोलीस यंत्रणेने काढला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तालुक्यातील सुगाव, कोटीतीर्थ भागात गस्तीवर असताना संशयित मारेकऱ्यांविषयी गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर ३० जानेवारी रोजी विष्णुपुरी धरणाच्या बाजूला असलेल्या पांदण रस्त्याच्या दिशेने रात्री एक संशयित व्यक्ती आढळून आला. त्याची चौकशी केली असता त्याने या घटनेचा उलगडा केला.

सतत फोन करुन त्रास देत असल्याने काढला काटा

२१ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता देवीदास बारसे याला संशयित मारेकरी प्रल्हाद वाघमारे व त्याचा मेहुणा सत्यनारायण उराडे यांनी ( रा. कोटीतीर्थ) चैतन्यनगर मार्गावरील एका रुग्णालयासमोरुन दुचाकीवर बसवले. मारेकऱयांनी नांदेड-सुगाव मार्गावरील पुलाच्या बाजूस असलेल्या पांदण रस्त्यावर नेऊन देवीदासचा खून केला व मृतदेह पोत्यात भरुन नदीपात्रात टाकल्याची कबुली दिली. प्रल्हादच्या मेहुणीस देवीदास हा सतत फोन करुन त्रास देत असल्याने लाथा बुक्क्यांनी व लाकडाने बेदम मारहाण करीत ठार केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. अधिक तपासासाठी आरोपींना वजिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
===============================================================================
मेहुणीला फोन करून त्रास देतो म्हणून त्याला केले ठार..

Intro:मेहुणीला फोन करून त्रास देतो म्हणून त्याला केले ठार..Body:मेहुणीला फोन करून त्रास देतो म्हणून त्याला केले ठार..


नांदेड: जिल्ह्यातील उमरी (ता.अर्धापूर) येथील देविदास बारसे बेपत्ता असलेल्या तरुणाचा खूनच झाला असून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अवघ्या चोवीस तासात या प्रकरणाचा छडा लावत संशयित मारेकऱ्याला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. मेहुणीला फोन करून त्रास देत होता म्हणून त्याला ठार केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे.
अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील रहिवासी देवीदास दत्तराम बारसे (४०) हे २१ जानेवारी रोजी सायंकाळी आपल्या एका नातेवाईकाला उपचारासाठी नांदेडला घेऊन गेले होते. या नातेवाईकाला रुग्णालयात दाखल करुन ते गावी जातो म्हणून निघाले ते गावाकडे परतले नाहीत. नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर अर्धापूर पोलीस ठाण्यात प्रकाश बारसे यांनी देवीदास बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. तरीही त्यांचा शोध लागला नाही. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाला नांदेड शहरातील डंकीन भागातील नाल्यात छिन्नविच्छिन्न स्थितीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. या फोटो सोशल मीडियातून व्हायरल केल्यानंतर हा मयत बेपत्ता देवीदास यांची असल्याची ओळख पटली.
घटनेची माहिती मिळताच शहर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, वजिराबादचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. देवीदास बारसे यांचा खूनच झाल्याचा निष्कर्ष पोलीस यंत्रणेने काढला आहे. या प्रकरणाच्या तपासार्थ स्थानिक गुन्हे शाखा पथक नांदेड तालुक्यातील सुगाव, कोटीतीर्थ भागात गस्तीवर असताना संशयित मारेकऱ्यांविषयी गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर या पथकाने आपला मोर्चा विष्णुपुरी धरणाच्या बाजूला असलेल्या पांदण रस्त्याच्या दिशेने वळविला. तेव्हा ३० जानेवारी रोजी रात्री त्यांना तेथे एक संशयित इसम आढळून आला. त्याची चौकशी केली असता त्याने या घटनेचा उलगडा करीत तपशीलवार माहिती दिली.

२१ जानेवारी रोजी रात्री साडे दहा वाजता देवीदास बारसे याला चैतन्यनगर मार्गावरील एका रुग्णालयासमोरुन आपल्या दुचाकीवर संशयित मारेकरी प्रल्हाद वाघमारे व त्याचा मेहुणा सत्यनारायण उराडे रा.कोटीतीर्थ यांनी देवीदासला घेतले आणि नांदेड ते सुगाव मार्गावरील पुलाच्या बाजूस असलेल्या पांदण रस्त्यावर नेऊन तेथे त्याचा खून केला व मृतदेह पोत्यात भरुन नदीपात्रात टाकल्याची कबुली आरोपींनी दिली आहे..

प्रल्हादच्या मेहुणीस देवीदास हा सतत फोन करुन त्रास देत असल्याने आम्ही त्याला निर्जनस्थळी नेऊन बुटाने, लाथांनी, बुक्क्या व लाकडाने बेदम मारहाण करीत ठार केले असेही आरोपींनी सांगितल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. आरोपीला वजिराबाद पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.Conclusion:

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details