नांदेड - जिल्ह्यातील विष्णुपुरी येथे काल (बुधवार) पोहण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय युवकाचा मृतहेद आज विष्णुपुरी येथील जलाशयात सापडला आहे. जीवरक्षक दलाच्या सदस्यांनी त्याचा मृतदेह विष्णुपुरी जलाशयातून बाहेर काढला. वाल्या बजरंग तनवीर (२२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
नांदेड : विष्णुपुरी प्रकल्पात तरुणाचा मृतदेह सापडला - man drownded in Vishnupuri dam news
बुधवारी सायंकाळी ४ च्या सुमारास विष्णुपुरी येथील जलाशयात पोहण्यासाठी गेलेला २२ वर्षीय युवक पाण्यात बुडाला होता. त्याचा मृतहेद आज जलाशयात सापडला.

विष्णुपुरी प्रकल्पात तरुणाचा बुडून मृत्यू
नांदेडच्या जुनामोंढा भागातील वाल्या बजरंग तनवीर हा काल सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पोहण्यासाठी विष्णुपुरी येथील जलाशयात गेला होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो त्यात बुडाला आणि परत पाण्याच्यावर आलाच नाही. जीवरक्षक सय्यद नूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुडालेल्या बजरंग तनवीरचा शोध घेण्यास आज सकाळी सुरुवात केली. त्यांनी बाल्याचा मृतदेह विष्णुपुरी जलाशयातून बाहेर काढला.