महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Malegao yatra 2022 : लोककलावंत उघड्यावर, लावणी कलावंत हॉटेलमध्ये - Folk art festival

माळेगाव यात्रेसाठी (Malegao yatra 2022) जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने लोककला महोत्सवासाठी कलावंत लावणीसाठी लावण्यवतींना निमंत्रीत केले आहे. या निमंत्रणाला मान देत कलावंतासह लावण्यसखी दाखल झाल्या आहेत. परंतु त्यांच्या नियोजनामध्ये जिल्हा परिषद प्रशासनाकडून भेदभाव करण्यात आता असून लोककला महोस्तव आणि बारीसाठी आलेल्या कलावंतांना पालीकेतही राहायला जागा मिळत नाही आहे.

Malegao yatra 2022
लोककलावंत उघड्यावर, लावणी कलावंत हॉटेलमध्ये

By

Published : Dec 25, 2022, 5:27 PM IST

नांदेड : प्रशासकीय स्तरावरील माळेगाव यात्रा (Malegao yatra 2022) ही दक्षिण भारतात लोककलावंत, भटके आणि घोड्यांचा बाजारासाठी प्रसिद्ध आहे. माळेगाव यात्रेसाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने लोककला महोत्सवासाठी कलावंत लावणीसाठी लावण्यवतींना निमंत्रीत केले आहे. या निमंत्रणाला मान देत कलावंतासह लावण्यसखी दाखल झाल्या आहेत. परंतु त्यांच्या नियोजनामध्ये जिल्हा परिषद प्रशासनाकडून भेदभाव करण्यात आता असून लोककला महोस्तव (Folk art festival) आणि बारीसाठी आलेल्या कलावंतांना राहायला जागा मिळत नाही. त्यामुळे कलावंतांची राहण्याची सोय होत नाही आहे. यापेक्षा लावण्यखी मात्र सुखी आहेत.

लोककलावंतांची होणारी बेपर्वाई परवड : लावण्यखी यांच्या राहण्याची व्यवस्था नांदेड शहरातील नामांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. त्या ठिकाणी त्यांच्या दिमतीला अधिकान्यांसह कर्मचारी आहेत. परंतु इकडे लोककलावंतांना मात्र कोणी विचारतही नाहीत, ही शोकांतिका. कलावंत हा कलावंत परंतु जि.प. प्रशासनाने त्यांच्यात भेदभाव केला आहे. जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि स्थानिक नेत्या- सत्ताधाऱ्यात मोठेपणासाठी लागलेला कलगीतुरा आणि लोककलावंतांची होणारी बेपर्वाई परवड या गोष्टी वेदना देणाऱ्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details