नांदेड - वजिराबाद पोलीस ठाण्यातील ( Wazirabad Police Station) गुन्हे शोध पथकाने पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख ( Chandrasen Deshmukh ) यांच्या मार्गदर्शनात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातून चोरी झालेल्या तसेच इतर जिल्ह्यातून चोरी झालेल्या 30 दुचाकी गाड्या पकडून तीन जणांना गजाआड केले ( Theft of 30 bikes ) आहे.
या 30 गाड्यांची किंमत 21 लाख 80 हजार रुपये असल्याची माहिती पोलीस जनसंपर्क विभागाने दिली आहे. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे ( Superintendent of Police Pramod Shewale ) यांनी ही कामगिरी करणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.
तीन जणांना ठोकल्या बेड्या - नांदेड जिल्ह्यातून, शहरातून दुचाकी गाड्या चोऱ्या होण्याचे प्रमाण कायमच आहे. यावर उपचार करण्यासाठी वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाने एक सुंदर व्युहरचना केली. या रचनेत त्यांना परभणीचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अभिनाश कुमार, पोलीस उपनिरिक्षक शेख करीम आणि पोलीस अंमलदार निलेश कांबळे यांची मदत घेतली.
त्यांनी परभणी येथील शेख अरबाज उर्फ कोबरा शेख चाँद (24) रा. दर्गाह रोड, पारवा गेट परभणी, आरेज खान उर्फ आमेर आयुब खान (28) रा. मोठा मारोती देशमुख गल्ली परभणी आणि मोहम्मद मुक्तदिर उर्फ मुक्का मोहम्मद अथर (31) रा. स्टेडीयम रोड परभणी यांना ताब्यात घेवून विचारणा केली. त्यांनी वजिराबाद - 6, नांदेड ग्रामीण - 1, शिवाजीनगर-3, भाग्यनगर-1, इतवारा-2, गंगाखेड - 5, कदीम जालना-2, आंबेजोगाई शहर-1 अशा 30 गाड्या चोरल्याची माहिती उघड झाली.