महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माहूर नगर पंचायतीकडून थकीत कर्ज वसुली मोहीम; ६ मोबाईल टॉवर सिल

परिणामी दिवसभर जियो, आयडिया, बीएसएनएल आणि इतर कंपन्यांची भ्रमणध्वनी सेवा ठप्प झाली होती.

मोबाईल टॉवर सिल

By

Published : Feb 5, 2019, 7:02 PM IST

नांदेड- माहूर नगर पंचायतीने आर्थिक चणचणीवर वसुलीचा उतारा शोधला आहे. नगर पंचायतीने थकीत करापोटी मालमत्ताधारकांसह आता मोबाइल कंपन्यांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. ४ फेब्रुवारीला नगरपंचायतच्या कर वसुली पथकाने शहरातील थकीत कर असणाऱ्या ६ टॉवरला सिल लावले. परिणामी आज दिवसभर जियो, आयडिया, बीएसएनएल आणि इतर कंपन्यांची भ्रमणध्वनी सेवा ठप्प झाली होती.

शहरातील काही इमारतींवर व मोकळ्या खासगी मालकीच्या जागेवर मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. मात्र, त्याचा कर भरण्यास टाळाटाळ केली जाते. काही टॉवर मालकांकडे मागील वर्षीची थकबाकी आहे. त्यामुळे अखेर नगरपंचायत प्रशासनाला सक्ती करून थकीत कर्ज वसुलीसाठी मोहीम हाती घ्यावी लागली. मुख्याधिकारी विद्या कदम, कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी, सहायक कार्यालयीन अधीक्षक सुनील वाघ, जीवन खडसे, विजय शिंदे, नय्युम पाशा, शंकर दामालावार, साजिद भाई यांच्या पथकाने सोमवारी दीपक बनगिंवार यांच्या मालकीच्या जागेवरील आयडिया, टाटा लाईन, जियो असे ३ तर देविदास पवार यांच्या मालकीच्या जागेवरील बीएसएनएल, जियो अशी २ आणि राठोड यांच्या इमारतीवरील इंटुस टेलिकॉमचे १ असे एकूण ६ टॉवर सिल केले. दरम्यान या कारवाईमुळे थकीत कर्ज असणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details