नांदेड - जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूर-किनवट या रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे समोर आले. या रस्त्याच्या कामात मातीमिश्रित मुरूमाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. गुरुवारी झालेल्या वळवाच्या पावसाने या रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पाडले आहे.
माहूर-किनवट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे; पहिल्याच पावसाने झाला चिखल - माहूर-किनवट रस्ता दर्जा
माहूर-किनवट रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे. मात्र, कामामध्ये मोठ्या प्रमाणात बोगसपणा होत आहे. रस्त्याच्या कामात भरणी करण्यासाठी मुरुमाऐवजी मातीचा वापर झाला आहे. वळवाच्या पहिल्याच पावसाने या रस्त्यावर चिखल झाला आहे.

या रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाच्या मुरुमाचा वापर होत असल्याच्या काही तक्रारी आल्या होत्या. मात्र, प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. आता या रस्त्याच्या कामाचा दर्जा उघडा पाडला आहे. नव्याने तयार होत असलेल्या या मार्गावर चिखल झाल्याने वाहने चिखलात फसत असून किरकोळ अपघातही होत आहेत.