महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडची बत्ती गुल.. वीज वाहिन्यांच्या देखभालीसाठी महावितरणचा निर्णय - पावसाळापूर्व देखभालीसाठी वीजपुरवठा बंद

पावसाळ्यात वादळी वाऱ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून देखभालीसाठी महावितरणकडून नांदेड शहर व परिसरातील वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

mahadiscom
महावितरण

By

Published : May 21, 2020, 10:15 AM IST

Updated : May 21, 2020, 2:36 PM IST

नांदेड- महावितरण व महापारेषणकडून पावसाळ्यापूर्वी वीज वाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी गुरुवारी रोजी शहरातील काही परिसराचा वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे. वीज ग्राहकांनी याची नोंद घेऊन वीज पुरवठा बंद असलेल्या काळात सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.

नांदेड शहर व परिसरातील वीज पुरवठा बंद

पावसाळ्यातील वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरण व महापारेषण कंपनीच्यावतीने पावसाळापूर्व देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी गुरुवारी नांदेड शहराला वीजपुरवठा करणाऱ्या १३२ केव्ही जंगमवाडी उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या ११ केव्ही विद्युत भवन वीजवाहिनीवरील नवामोंढा, दत्तनगर, सांगली, विमानतळ परिसर, एमजीएम परिसर तसेच ११ केव्ही आनंद नगर, पोलीस कॉलनी, विवेक नगर, गणेश नगर, गजानन मंदिर व पावडेवाडी वीज वाहिनीवरील परिसराचा वीजपुरवठा सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहील.

१३२ केव्ही इलिचपूर उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या ३३ केव्ही तुप्पा, एसआरटी, कौठा वीज वाहिनीवरील विष्णुपुरी, असर्जन, कौठा, पुणेगाव, काळेश्वर व पांगरा आदी परिसराचा वीजपुरवठा सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहील. १३२ केव्ही जंगमवाडी उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या ३३ केव्ही देगाव वीजवाहिनीवरील जळगाव, शेगाव व पिंपळगाव आदी परिसराचा वीजपुरवठा सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत बंद राहील, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

Last Updated : May 21, 2020, 2:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details