महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पीकविमा भरण्यासाठी महा ई-सेवा, सीएससी केंद्र 31 जुलैपर्यंत 24 तास सुरू

शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र वगळून जिल्ह्यातील उर्वरित सर्व महा ई-सेवा केंद्र व सी.एस.सी. केंद्र हे शुक्रवार 31 जुलैपर्यंत 24 तास चालू ठेवण्यात येणार आहेत.

नांदेड
नांदेड

By

Published : Jul 25, 2020, 3:13 PM IST

नांदेड - शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र वगळून जिल्ह्यातील उर्वरित सर्व महा ई-सेवा केंद्र व सी.एस.सी. केंद्र हे शुक्रवार 31 जुलैपर्यंत 24 तास चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मुभा दिली आहे. यापूर्वी निर्गमीत केलेले निर्देश, अटी व शर्ती इतर दुकाने, आस्थापना जशाच तसे लागू राहतील.

शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी शिल्लक असलेला अत्यल्प कालावधी विचारात घेऊन नांदेड जिल्ह्यातील शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहू नये, यासाठी हा आदेश निर्गमीत केला आहे. जिल्हादंडाधिकारी यांनी 24 जुलैपासून निर्गमीत केलेल्या आदेशातील नियमावलीसह पुढील आदेशापर्यंत नांदेड जिल्हा हा नॉन रेड झोनमध्ये आहे.

या आदेशानुसार आस्थापने व दुकाने प्रतिबंधित क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील दुकाने व खासगी आस्थापनांना केवळ सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 7 ते दुपारी 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मुभा दिली आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details