महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिस्तुलाचा धाक दाखवत पावणे तीन लाख लुटणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक

नांदेड शहरातील पद्मजा सिटीसमोर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पिस्तुलाचा धाक दाखवून एका ट्रकमधून पावणेतीन लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

By

Published : Feb 2, 2021, 9:46 PM IST

crime
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक

नांदेड - शहरातील पद्मजा सिटीसमोर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पिस्तुलाचा धाक दाखवून एका ट्रकमधून पावणेतीन लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेतील दोन्ही आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात आवळल्या. त्यामुळे नांदेड शहरात क्राईम करणाऱ्या गुन्हेगारांची कंबरडे पुन्हा एकदा मोडण्यात आले आहे.

लातूर रोडवर घडली होती घटना

लातूर येथील लहू लांडगे हा ट्रकमधून दूध घेऊन कळबकडे जात होता. सकाळी साडेदहाच्या सुमारास हा ट्रक नांदेड शहरालगत असलेल्या पद्मजा सिटी समोर आला असता दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी ट्रक अडवला. ट्रकचालकाला पिस्तुलचा धाक दाखवून तर ट्रक चालकाच्या सहायकला चाकूचा धाक दाखवून ट्रकमधील 2 लाख 77 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास करण्यात आली होती.

गुप्त माहितीवरून लागला सुगावा

सदर गुन्हयाचा पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांचेकडून समांतर तपास सुरू असताना , पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांना गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा आशिष सपूरे रा. नंदीग्राम सोसायटी नांदेड याने त्याच्या साथीदारांसह मिळून केला आहे.

नंदीग्राम सोसायटीतून घेतले ताब्यात

सदर माहीतीवरून सदर गुन्हयाच्या तपास पथकातील सपोनि पी. डी. भारती व स्टाफ यांनी सदर आरोपी आशिषसिंघ सपूरे रा . नंदीग्राम सोसायटी नांदेड यांना ताब्यात घेऊन सदर गुन्हयाबाबत विचारपूस केली असता, त्याने सदर गून्हा केल्याचे सांगितले.

एकूण चार आरोपीना घेतले ताब्यात

तसेच सदर गुन्हा करताना त्याच्या सोबत आणखी तीघे जन असल्याचे सांगितले . सदर गुन्हयाच्या तपासात निष्पन्न चारही आरोपी असल्याचे लक्ष्यात आले. यामध्ये प्रतापसिंघ ऊर्फ छोटू बाबूसिंघ सिरपल्लीवाले वय २५ वर्षे रा. नंदीग्राम सोसायटी नांदेड, रोहीतसिंघ दिदारसिंघ साहनी वय २० वर्षे गूरूव्दार गेट नं . ०१ नांदेड, हरपालसिंघ शंकरसिंघ बोरगाववाले वय २४ वर्षे रा . अबचलनगर कमानीसमोर, बडपूरा नांदेड, बलप्रीतसिंघ ऊर्फ आशिषसिंघ नानकसिंघ सपूरे वय २३ वर्षे रा . नंदीग्राम सोसायटी नांदेड यांना अटक करण्यात आली. त्यांचेकडून सदर गुन्हयातील चोरीस गेलेले नगदी २ लाख ६० रूपये, एक चोरीची यूनिकॉर्न मोटार सायकल , एक मोबाईल हँडसेट , एक नकली पिस्टल असा एकूण २ लाख ६६ हजार ६० रूपयाचा मूददेमाल जप्त करण्यात आला आहे . सदर आरोपींना जप्त मूददेमालासह पूढील कायदेशीर कार्यवाहीस्तव पो.स्टे . नांदेड ग्रामीण यांच्या ताब्यात दिले आहे . सदर आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून , त्यांचेकडून आणखी गून्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details