महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमधील शाळेत खिचडीत शिजली पाल; भोजनातून ५६ विद्यार्थ्यांना विषबाधा - lizard found in school

नांदेडमधील सगरोळी येथील श्री.छत्रपती हायस्कुलच्या मध्यान्ह भोजनातील खिचडीत शिजलेल्या पालीमुळे शाळेतील ५६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे.

विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले

By

Published : Jul 24, 2019, 9:56 PM IST

नांदेड -बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या श्री. छत्रपती विद्यालयाच्या मध्यान्ह भोजनातील खिचडीत शिजलेल्या पालीमुळे शाळेतील ५६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. या मुलांवर बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

छत्रपती विद्यालयाच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मध्यान्ह भोजनात खिचडी देण्यात आली. खिचडी खाल्ल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना चकरा येणे सुरू झाले. एका विद्यार्थिनीने शिक्षकांना खिचडीत निघालेली पाल दाखवली. यानंतर अनेक विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास झाला. त्यानंतर शिक्षकांनी खिजडी खाल्लेल्या विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिक्षक डॉ.नागेश लखमावार यांनी दिली.

शाळेतील ८ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर

उपचार घेत असलेल्या शिवलिंग शंकर शबेटमोगरे (१२), श्रीकांत विठ्ठल मांगीलवार (१२), पूजा संतोष गायकवाड (१४), विजय साहेबराव अंजनबाई (१३), मनोज संजय गरबडे (१४), सौंदर्य विनायक शिंदे (१४), स्वामी मन्मथ स्वामी (१४), महाळसा लक्ष्मण रामटक्के (१३) या विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details