नांदेड -जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात एक बिबट्या विहिरीत पडल्यानंतर त्यास वनविभागाने पकडून जंगलात सोडून दिले. पण त्याचाच दुसरा साथीदार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अजून एक बिबट्या शेतकऱ्यांच्या नजरेत येत असून त्याच्या मुक्तसंचारामुळे शेतकऱ्यांत भीतीचे सावट आहे.
अर्धापूर तालुक्यात मुक्तसंचार
अर्धापूर तालुक्यात बिबट्याचा मुक्तसंचार सुरूच असून कारवाडी शिवारात एका शेतकऱ्याच्या नजरेस दिसून आला. यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात काही दिवसांच्या अंतराने पुन्हा बिबट्याचा वावर असल्याच्या माहितीमुळे शेतकरी चिंतेत आहे.
वन विभागाची गस्त
याच परिसरातील काही दिवसांपूर्वी बिबट्याने एक जनावर फस्त केले. या परिसरात बिबट्याचा संचार सुरू आहे. या परिसरात घडलेल्या घटनेने वनविभाग सतर्क झाला. या परिसरात वनविभागाने गस्त सुरू केली.