नांदेड -अर्धापूर तालुक्यातील खैरगावा (म) येथील एका शेतातील आखाड्यावर बिबट्याने बकऱ्यांचा फडशा पाडल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात काही दिवसाच्या अंतराने पुन्हा बिबट्याचा वावर असल्याच्या संशयामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तर वनविभागाने या घटनेची माहिती घेण्यासाठी कर्मचारी पाठविला आहे.
खैरगाव शिवारात घडली घटना
अर्धापूर तालुक्यातील रोडगी शिवारात अनिल कदम यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला चार तास रेस्क्यु आपरेशन करुन सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाच्या रेस्क्यु टिमला यश आले होते. ही घटना गुरुवारी ( दि 14 ) झाली होती. त्यानंतर याच परिसारातील खैरगावा (म) येथील एका शेतातील आखाड्यावर बकऱ्यांचा फडशा पाडल्याची घटना पुढे आली.
बिबट्याने दोन बकऱ्यांचा पाडला फडशा; शेतकऱ्यात भितीचे वातावरण
अर्धापूर तालुक्यातील रोडगी शिवारात अनिल कदम यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला चार तास रेस्क्यु आपरेशन करुन सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाच्या रेस्क्यु टिमला यश आले होते. ही घटना गुरुवारी ( दि 14 ) झाली होती. त्यानंतर याच परिसारातील खैरगावा (म) येथील एका शेतातील आखाड्यावर बकऱ्यांचा फडशा पाडल्याची घटना पुढे आली आहे.
खैरगाव शिवारात सतीष संजय लांडगे यांचे शेत आहे. या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या शेतमजूराने आखाड्यावर बकऱ्याला बांधले होते. सदरील बकऱ्यास शुक्रवारी (दि. 15) रात्री बिबट्याने फस्त केल्याची घटना शनिवारी सकाळी (दि. 16 ) उघडकीस आली आहे, अशी माहिती पंजाब चव्हाण यांनी दिली.
याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी शरयू रुद्रावार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, सदरील घटनेची माहिती घेण्यासाठी कर्मचाऱ्याला खैरगावाला पाठविण्यात येईल. सदरील बकऱ्यास जर वन्यपशुने मारले असतील तर शासनाच्या नियमाप्रमाणे शासकीय मदत देण्यात येईल. तसेच बिबट्याचा शोध घेण्यात येईल, अशी माहिती दिली.
दोन बिबटे असल्याचा संशय
या परिसरात दोन दिवसाच्या आड बिबट्याचा वावर असल्याचा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे दोन्ही बिबटे एकाचवेळी शिकारीसाठी बाहेर पडले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. तर वनविभागाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.