नांदेड - तीर्थक्षेत्र माहूर शहारत बिबट्याचे पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. यामुळे माहूर शहरातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वनविभागकडून करण्यात आले आहे.
माहूर शहरात आढळल्या बिबट्याच्या पाऊलखुणा, नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना - leopard footprints
शहरातील तहसील कार्यालयाच्या परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. या पाऊलखुणा बिबट्याच्या असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले असून, शहरातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन माहूर वनविभागाकडून करण्यात आले आहे.
तीर्थक्षेत्र माहूर शहरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याची चर्चा संपूर्ण शहरात पसरली होती. मात्र आता शहरातील तहसील कार्यालयाच्या परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. या पाऊलखुणा बिबट्याच्या असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले असून, शहरातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन माहूर वनविभागाकडून करण्यात आले आहे.
सध्या नैसर्गिक पाणवठे आटून गेले आहेत, त्यामुळे वन्यप्राण्यांची भटकंती होत आहे. त्यातूनच बिबट्या शहराकडे आला असावा अशी चर्चा शहरात रंगली आहे. दरम्यान वनविभागाकडून या घटनेची नोंद घेऊन बिबट्याचा शोध घेण्यास सुरू केले आहे.