महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...म्हणून दुकानदाराची ग्राहकाला जबर मारहाण, नांदेडमधील घटना - नांदेड न्यूज

साप्ती या गावातील केशव कदम हे किराणा मालाच्या खरेदीसाठी जवळच असलेल्या तळणीतील बाजारपेठेत गेले होते. तेथील डुब्बेवार यांच्या किराणा दुकानात त्यांनी पोहे, गोडेतेल, व पतंजली बिस्कीट आणि इतर सामान खरेदी केले. नियमित भावाप्रमाणे या सर्व मालाची किंमत 2 हजार 450 रुपये होत असताना त्या दुकानदारांनी या मालाचे 2 हजार 980 रुपये मागितले.

NANDED
NANDED

By

Published : Apr 7, 2020, 10:10 AM IST

नांदेड - हदगावमध्ये जीवनावश्यक वस्तूच्या किमती वाढवून नफेखोरी करणाऱ्या किराणा दुकानदाराला विरोध केल्यामुळे दुकानदाराने ग्राहकाला मारहाण केल्याची घटना तळणीत घडली आहे.

साप्ती या गावातील केशव कदम हे किराणा मालाच्या खरेदीसाठी जवळच असलेल्या तळणीतील बाजारपेठेत गेले होते. तेथील डुब्बेवार यांच्या किराणा दुकानात त्यांनी पोहे, गोडेतेल, व पतंजली बिस्कीट आणि इतर सामान खरेदी केले. नियमित भावाप्रमाणे या सर्व मालाची किंमत 2 हजार 450 रुपये होत असताना त्या दुकानदारांनी या मालाचे 2 हजार 980 रुपये मागितले.

यावरून त्या दोघात वाद झाला. डुब्बेवार बंधूंनी केशव कदम यांना लाथा-बुक्क्यांनी व रस्त्यावर पाडून तुडवून मारले. यात ग्राहक केशव कदम यांना गंभीर जखम झाली. पुन्हा जर असे केले तर तुझ्या घरी येऊन मारतो, अशी धमकी दिली. यानंतर इतर कांही ग्राहकांनी त्यांची सोडवणूक केली. या प्रकरणी कदम यांच्या तक्रारीवरून हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details