नांदेड :प्रियकराच्या साथीने पतीचं अपहरण करुन विवाहितेने त्याला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला ( Husband Kidnapped With The Help of Lover )आहे. नांदेडमधील मालेगाव रोड परिसरात मारहाणीचा प्रकार घडला. मुलाच्या ताब्यावरून पती-पत्नीमध्ये नेहमी वाद घडत ( Argument Between Husband And Wife On Child Custody ) असत. यावरुनच महिलेने प्रियकर आणि अन्य तिघांच्या मदतीने पतीचे अपहरण केले. त्यानंतर त्याला मारहाण केल्याचा आरोप केला जात ( Beating Husband After Kidnapped )आहे.
Husband Kidnapping Case : प्रियकराच्या साथीने पतीचे केले अपहरण, पत्नीसह चौघांना अटक - Beating Husband After Kidnapped
नांदेडमधील मालेगाव रोड परिसरात प्रियकराच्या साथीने पतीचे अपहरण करुन पत्नीने त्याला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला ( Husband Kidnapped With The Help of Lover ) आहे. मुलाच्या ताब्यावरून पती-पत्नीमध्ये नेहमी वाद घडत ( Argument Between Husband And Wife) असत.
प्रियकराच्या मदतीने पतीचे अपहरण : प्रियकराच्या मदतीने पतीचे अपहरण करून मारहाण करणाऱ्या पत्नीसह इतर तीन आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गीतांजली हाके, बालाजी जाधव, दिलीपसिंघ पवार, अवतारसिंघ रामगडीया, अमोल भुक्तरे अशी या पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. मुलाच्या ताब्यावरून पती प्रकाश श्रीरामे आणि पत्नी गीतांजली हाके यांच्यात नेहमी वाद होत असत. मुलांचा ताबा देण्यास नकार दिल्याने गुरुवारी पत्नी गीतांजली हाके हिने प्रियकर आणि इतर साथीदारांच्या मदतीने पती प्रकाश श्रीरामे यांचे अपहरण केले.
जबर मारहाण :अपहरण करुन सौरभ बार मालेगाव रोड परिसरात नेऊन श्रीरामे यांना जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. पीडित पतीच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी पत्नी गीतांजली हाके, बालाजी जाधव, दिलीपसिंघ पवार, अवतारसिंघ रामगडीया, अमोल भुक्तरे यांच्या विरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी घटनेच्या काही तासातच सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी न्यायालयात या आरोपींना हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपीना ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.