नांदेड - जिल्ह्यात २ दिवसांपासून होणाऱ्या भीज पावसामुळे खरिपातील पिकांना पोषक वातावरण तयार झाले आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २९.३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या भीज पावसाने खरिपाची पिके बहरली मात्र, पाणीसाठ्यात अद्यापही अपेक्षित वाढ नाही.
नांदेडमध्ये श्रावणाच्या सरीने खरिपाची पिके बहरली हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ४६९ मिलिमीटरनुसार ५०.५२ टक्क्यांवर पोचला आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २९.६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस नांदेड, मुदखेड, अर्धापूर, भोकर, लोहा, किनवट, हिमायतनगर, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव व मुखेड तालुक्यात चांगला झाला. जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या ४६९ मिलिमीटरनुसार ५०.५२ टक्के पाऊस झाला. हा पाऊस पिकांना हवा तसा भीज स्वरूपात असल्यामुळे जमिनीत पाणी मुरत आहे. परिणामी जिल्ह्यातील खरीप पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. पण पाणीसाठ्यात मात्र कुठलीही वाढ नसल्याचे दिसून येत आहे.
नांदेड जिल्ह्यातील पावसाची टक्केवारी
१) नांदेड = २०.३८
२) मुदखेड = २४.००
३) अर्धापूर = ०९.६७
४) भोकर = ०९.७५
५) उमरी = ३२.६७
६) कंधार = ६५.००
७) लोहा = ५३.००
८) किनवट = १७.००
९) माहूर = १६.५०
१०) हदगाव = ०७.४३
११) हि. नगर = ०३.६७
१२) देगलूर = ३०.५०
१३) बिलोली = ५६.८०
१४) धर्माबाद = ३०.६७
१५) नायगाव = ४४.२८
१६) मुखेड = ४८.७१
एकूण = ४६९.९५
एकूण टक्केवारी = २९.३७
विष्णुपुरी धरणात अद्यापही पाणीसाठ्यात वाढ नाही...!
नांदेडला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात गुरुवारी सकाळी मृत पाणीसाठ्याच्यावर आले आहे. सध्या प्रकल्पात थोडी वाढ होत आहे. एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे महापालिकेच्यावतीने ६ दिवसांआडच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गोदावरी तसेच पूर्णा नदीच्या वरील भागात अजूनही म्हणावा तेवढा पाऊस झाला नाही. त्यामुळे विष्णुपुरीत पाणीसाठा झाला नाही. पूर्णा नदीला थोडेफार पाणी आले असून ते अंतेश्वर बंधाऱ्यातून पुढे गोदावरीत आले आहे. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.