नांदेड -मुखेड तालुक्यातील केरूर येथे पत्नीचा खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि 5 हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश अतुल सलगर यांनी ही शिक्षा सुनावली.
मुखेड तालुक्यातील केरूर येथील घटना -
आरोपी पाशामिया गफूर शेख याने 11 जानेवारी 2016 मध्ये आपल्या पत्नीचा खून केला होता. गुन्हेगाराने पत्नी रोशनबी पाशामियाला आपल्या घरातील तूर का विकू दिली नाही? या कारणावरून पत्नीवर चाकूने वार केला होता. यात तीच मृत्यू झाला होता. यानंतर मुखेड पोलिसांनी स्वत: आरोपीवर गुन्हा दाखला केला होता.
हेही वाचा - जालना : महिला पोलीस उपनिरीक्षकावर चाळीस हजारांची लाच मागितल्याप्रकणी गुन्हा दाखल
पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे यांनी या प्रकरणात वेळोवेळी मार्गदर्शन केले. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर पाशामिय शेख याच्याविरूद्ध सहायक पोलीस निरीक्षक के. एन. चव्हाण यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.
सरकार पक्षाच्यावतीने सहायक सरकारी वकील अॅड. महेश कागणे यांनी एकूण 15 साक्षीदारांच्या साक्ष न्यायाधीशांपुढे मांडल्या. या घटनेतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पाशामियाचा मुलगा सैलानी शेख हा होता. मुखेडचे सत्र न्यायाधीश अतुल सलगर यांनी सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य मानून आरोपीला जन्मठेप आणि 5 हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे. आरोपीची औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
हेही वाचा - जालन्यात सापडले 7 वे पिस्तूल; 4 लाखांचा मुद्देमाल जप्त