नांदेड -शहरातील सामाजिक कार्यकर्ते ॲड. दिलीप ठाकूर यांचे विविध सामाजिक उपक्रम सुरूच असतात. नुकताच त्यांनी रस्त्यावर फिरणारे बेघर, भटके, मतिमंदाच्या आरोग्याची काळजी घेत शरीराची स्वछता राहावी यासाठी त्यांची दाढी कटिंग करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मागील आठवड्यापासून हा उपक्रम सुरू असून पाऊस पडत असताना देखील 'नियोजित कायापालट' या उपक्रमाच्या दुसऱ्या आठवड्यात 21 बेघरांची मोफत दाढी कटिंग करून नवीन कपडे जेवण व रोख रक्कम बक्षिसही देण्यात आले आहे.
आर्थिक अडचणीमुळे किंवा मानसिकरित्या कमकुवतपणामुळे रस्त्यावरील निराधारांना विश्वासात घेऊन त्यांची कटिंग दाढी करण्याचा 'कायापालट' हा उपक्रम पंधरा दिवसापूर्वी दिलीप ठाकूर यांनी सुरू केला. दाढी कटिंग करण्याचा निरोप सर्व बेघरांना आधीच देण्यात आला होता. मध्यरात्रीपासून तुफान पाऊस पडत असल्यामुळे कार्यक्रम रद्द करण्याची परिस्थिती असतानाही ॲड. दिलीप ठाकूर यांनी हा उपक्रम सुरू ठेवून सामाजिक कार्याचा वसा जोपासला आहे.
रस्त्यावरील बेघराचा शोध घेत केला कायापालट