महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

करमाड-जालना रेल्वे रुळ दुरुस्तीसाठी १४ दिवस लाईन ब्लॉक, वाचा कोणती गाडी कधी धावणार - करमाड-जालना रेल्वे रुळ दुरुस्ती

करमाड-बदनापूर-जालना सेक्शनमधील रेल्वे पटरीची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी १४ दिवस तीन तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक करमाड ते बदनापूर सेक्शनमध्ये (दि.१४ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट)दरम्यान ८ दिवस घेण्यात येणार आहे. तर, बदनापूर ते जालना सेक्शन दरम्यान दिनांक ०१ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर दरम्यान ६ दिवस घेण्यात येणार आहे. या लाईन ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावतील. अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून देण्यात आली आहे.

करमाड-जालना रेल्वे रुळ दुरुस्तीसाठी १४ दिवस लाईन ब्लॉक
करमाड-जालना रेल्वे रुळ दुरुस्तीसाठी १४ दिवस लाईन ब्लॉक

By

Published : Aug 14, 2021, 7:11 PM IST

नांदेड - विभागातील करमाड-बदनापूर-जालना सेक्शनमधील रेल्वे पटरीची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी १४ दिवस तीन तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक करमाड ते बदनापूर सेक्शनमध्ये (दि.१४ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट)दरम्यान ८ दिवस घेण्यात येणार आहे. तर, बदनापूर ते जालना सेक्शन दरम्यान दिनांक ०१ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर दरम्यान ६ दिवस घेण्यात येणार आहे. या लाईन ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावतील. अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून देण्यात आली आहे.

कोणत्या गाड्या उशिरा धावणार-

१)करमाड ते बदनापूर ०३. २० ते ०६.२० (१८० मिनिटे)

१४/८/२०२१(शनिवार)
१६/८/२०२१ (सोमवार)

१८/८/२०२१(बुधवार)
२१/८/२०२१ (शनिवार)
२३/८/२०२१ (सोमवार)
२५/८/२०२१ (बुधवार)
२८/८/२०२१ (शनिवार)
३०/८/२०२१ (सोमवार)

२) गाडी संख्या ०७०५० औरंगाबाद ते हैदराबाद ही विशेष गाडी औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून तिच्या नियमित वेळ दुपारी ०४.१५ ऐवजी १२५ मिनिटे उशिरा म्हणजेच सायंकाळी ०६.२० वाजता सुटेल.


ब्लॉक नसलेल्या दिवशी हि गाडी तिच्या नियमित वेळे नुसार धावेल

३) बदनापूर ते जालना -०३.३५ ते ०६.३५

०१/०९/२०२१ (बुधवार)
०४/०९/२०२१ (शनिवार)
०६/०९/२०२१(सोमवार)
०८/०९/२०२१ (बुधवार)
११/९//२०२१ (शनिवार)
१३/९/२०२१ (सोमवार

ABOUT THE AUTHOR

...view details