महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

न्यायाधीशांची सामाजिक बांधिलकी; वाटसरूंना खाद्यपदार्थांसह गरजेच्या वस्तूंचे वाटप...! - न्यायाधीशांनी जपली सामाजिक बांधिलकी

भोकरचे जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख व वकील मंडळी त्याच बरोबर न्यायालयीन कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने शनिवारी भोकर फाटा येथे परराज्यातील ट्रक ड्रायव्हर, क्लिनर,व रस्त्याने घराकडे जाणाऱ्या मजूर, कामगारांना, वाटसरु व गरजूंना फळ वाटप करण्यात आले.

Judge's help to travelers in nanded
न्यायाधीशांची सामाजिक बांधिलकी

By

Published : May 24, 2020, 11:01 AM IST

Updated : May 24, 2020, 4:20 PM IST

नांदेड- जिल्ह्यातील भोकर येथील न्यायाधीशांनी नागपूर महामार्गावर जाणाऱ्या वाटसरू आणि वाहनाना थांबवून त्यांना फळे, पाणी बॉटल, बूट, चप्पल व रुमाल आदी देऊन सामाजिक बांधिलकी जपली. या मार्गावरुन जाणाऱ्या कामगार, मजूर, विद्यार्थी व वाटसरूंना भोकर येथील विधिसेवा समिती अध्यक्ष व जिल्हा न्यायालयाचे न्यायधीश मुजीब एस शेख, न्यायाधीश मंदार पांडे, न्यायाधीश बी. ए. तळेकर यांच्या हस्ते मदतीचे वाटप भोकर फाटा येथे करण्यात आले.

न्यायाधीशांची सामाजिक बांधिलकी

कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे सर्वांना हैराण करून सोडले आहे. व्यापार, उद्योग आदी कामे सर्वत्र ठप्प झाल्याने मानवी जनजीवन अगदी विस्कळीत झाले. यात गोरगरीब,मजूर व कामगार यांचा मात्र नाहक बळी जाताना दिसत आहे. उपासमारीची वेळ आल्याने मजूर जमेल त्या पद्धतीने आपले घर गाठण्यासाठी धडपडत आहे. त्यांच्यासाठी काही मदत देता यावी या भावनेतून भोकरचे जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख व वकील मंडळी त्याच बरोबर न्यायालयीन कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने शनिवारी भोकर फाटा येथे परराज्यातील ट्रक ड्रायव्हर, क्लिनर,व रस्त्याने घराकडे जाणाऱ्या मजूर, कामगारांना, वाटसरु व गरजूंना फळ वाटप करण्यात आले. उन्हापासून सरंक्षण व्हावे यासाठी अनवाणी पायी चालणाऱ्याना चप्पल व रुमालाचे वाटप केले.

टसरूंना खाद्यपदार्थांसह गरजेच्या वस्तूंचे वाटप...

केळी, कलिंगड, बिस्कीट, पाणी बाटली व गरजूंना चप्पल व रुमाल ह्या वस्तूंचे एक किट तयार करून सोशल डिस्टन्सिंग ठेवून वाटप आले. यावेळी अर्धापूरचे तहसीलदार सुजित नरहरे, अभिवक्ता संघाचे अॅड. एस.एस. कुंटे, अॅड.संदीप कुंभेकर, अॅड.शिवाजी कदम यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी विठ्ठल कृष्णावाड, अजय नेहुलकर, गोंविद रामकिर्ते, विजय मंडले, विनायक गांजरे, सय्यद इम्रान, फौजदार के.पी.आगलावे, प्रकाश वावळे, किशोर पाटील, संदिप पाटील, राजेश कांबळे,जाधव, घुले आदीनी परिश्रम घेतले.

Last Updated : May 24, 2020, 4:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details