महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ओबीसींचा प्रश्न कसा सोडवाल ते सांगा, सत्तेत येण्याची गरज नाही; जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला - reservation jayant patil criticize fadnavis

ओबीसींचा कळवळा असेल तर प्रश्न कसा सोडवाल, ते सांगा, आम्ही सोडवू, त्यासाठी तुम्ही सत्तेत येण्याची गरज नाही. कारण जनतेने तुम्हाला नाकारले आहे, असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीस यांना लगावला. ते नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेदरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

obc reservation problem jayant patil
जयंत पाटील टोला फडणवीस

By

Published : Jun 27, 2021, 7:55 PM IST

नांदेड - सत्तेत आल्यानंतर चार महिन्यांत ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणाचा प्रश्न सोडवू, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर जयंत पाटील यांनी नांदेडमध्ये प्रत्युत्तर दिले. ओबीसींचा कळवळा असेल तर प्रश्न कसा सोडवाल, ते सांगा, आम्ही सोडवू, त्यासाठी तुम्ही सत्तेत येण्याची गरज नाही. कारण जनतेने तुम्हाला नाकारले आहे, असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीस यांना लगावला. ते नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेदरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रतिक्रिया देताना मंत्री जयंत पाटील

हेही वाचा -नांदेडमध्ये शासकीय धान्य घोटाळा प्रकरणात 'ईडी'कडून एकाला अटक

पदोन्नतीबाबत आघाडीत कुठलाही विसंवाद नाही

पदोन्नती आरक्षणाविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेविषयी मंत्री नितीन राऊत यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे, पदोन्नती अरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद असल्याचे बोलले जात होते. याविषयी आज नांदेड येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विचारणा केली असता, पदोन्नतीवरून सरकारमध्ये कोणताही विसंवाद नसून बाहेर विरोधी पक्षाने वातावरण तयार केल्याचे ते म्हणाले.

सत्तेत येऊन प्रश्न सोडविण्यापेक्षा फडणवीस यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे

ओबीसींचा कळवळा असेल तर प्रश्न कसा सोडवाल, ते सांगा, आम्ही सोडवू, त्यासाठी तुम्ही सत्तेत येण्याची गरज नाही. कारण जनतेने तुम्हाला नाकारले आहे, असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीस यांना लगावला.

देशमुख यांच्यावरील कारवाई आकसापोटी

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप बिनबुडाचे आहे. केंद्र सरकार आकसापोटी प्रशासकीय यंत्रणा हाताशी धरून चौकशी लावत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

हेही वाचा -दारू पिण्यास विरोध केल्याने पतीने केला पत्नीचा खून

ABOUT THE AUTHOR

...view details