नांदेड - छत्तीसगड येथे झालेल्या माओवादी नांदेड जिल्ह्यातील एक जवान शहीद झाले आहेत. मुखेड तालुक्यातील बामणी येथील सुधाकर शिंदे असं या जवानाचे नाव आहे. सुधाकर शिंदे हे इंडो तिबेटीयन बटालियनचे सहायक सेनानी होते. शुक्रवारी दुपारी दरम्यान नारायणपूर येथे माओवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला होता. या दुःखद घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
दोन जवान शहीद
नारायणपूर येथे शुक्रवारी झालेल्या माओवादी हल्लयात दोन जवानांना वीरमरण आलं आहे. या हल्ल्यात जवान सुधाकर शिंदे आणि गुरुमुख सिंह हे शहीद झाले आहेत. दोघेही इंडो तिबेटीयनचे दलाचे जवान होते. शुक्रवारी दुपारी छत्तीगडमधील नारायणपूर येथे करिया मेटाजवळ रोड ओपनिंग करण्यासाठी गेले होते. यावेळी माओवाद्यांनी अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला. यावेळी दोन्ही जवानांनी प्रत्युत्तर दिलं. मात्र, माओवाद्यांनी दोन्ही जवानांवर प्राणघातक हल्ला केला.
नांदेड जिल्ह्यावर शोककळा-
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याच्या बामणी येथील सुपूत्र आणि इंडो तिबेटीयन बटालियनचे सहायक सेनानी सुधाकर शिंदे हे माओवाद्यांनी केलेल्या हल्लयात शहिद झाले. सुधाकर शिंदे हे मुखेड तालुक्यातील बामणी येथील रहिवाशी आहेत. मुक्रमाबाद येथील डॉ.भाऊसाहेब देशमुख विद्यालयातील त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर परभणीच्या कृषी विद्यापीठातून ते बीएसस्सी ॲग्रीचे शिक्षण पूर्ण केलं होतं. यानंतर त्यांनी भारतीय सैन्यात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
माओवाद्यांच्या हल्ल्यात जवान सुधाकर शिंदे शहीद; नांदेड जिल्ह्यावर पसरली शोककळा.
नारायणपूर येथे शुक्रवारी झालेल्या माओवादी हल्लयात दोन जवानांना वीरमरण आलं आहे. या हल्ल्यात जवान सुधाकर शिंदे आणि गुरुमुख सिंह हे शहीद झाले आहेत. दोघेही इंडो तिबेटीयनचे दलाचे जवान होते. शुक्रवारी दुपारी छत्तीगडमधील नारायणपूर येथे करिया मेटाजवळ रोड ओपनिंग करण्यासाठी गेले होते.
Sudhakar Shinde
Last Updated : Aug 20, 2021, 11:00 PM IST