महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नारायण राणे यांच्यावर न बोललेलंच बरं- अशोक चव्हाण - काँग्रेसचे आंदोलन

राणे यांच्यावर न बोललेलंच बरं, आम्ही छत्रपती शाहू महाराजांचे अनुयायी या नात्याने सर्वसामांन्याचे प्रश्न सोडवू अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. मराठा आरक्षण मुद्यावर नुकत्याच झालेल्या गोलमेज परिषदेत नारायण राणे यांनी आक्रमक वक्तव्य केले होते. राणे यांचे हे नेहमीचेच काम आहे, अशी टीका करत अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण

By

Published : Jun 26, 2021, 7:48 PM IST

नांदेड - राणे यांच्यावर न बोललेलंच बरं, आम्ही छत्रपती शाहू महाराजांचे अनुयायी या नात्याने सर्वसामांन्याचे प्रश्न सोडवू अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. मराठा आरक्षण मुद्यावर नुकत्याच झालेल्या गोलमेज परिषदेत नारायण राणे यांनी आक्रमक वक्तव्य केले होते. राणे यांचे हे नेहमीचेच काम आहे, अशी टीका करत अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नारायण राणे यांच्यावर न बोललेलंच बरं- अशोक चव्हाण

'अनिल देशमुख यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई'
अनिल देशमुख यांच्यावरील ईडीची कारवाई म्हणजे राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई असल्याची टिका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. भाजपा सूडबुद्धीने शासकीय यंत्रणांचा वापर करत असल्याचे देखील ते म्हणाले. नांदेड येथे अशोक चव्हाण यांनी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

'देशातील आरक्षण पद्धत संपवण्याचा भाजपाचा कट'
देशातील आरक्षणाची पद्धतच भाजपाला संपवायची आहे, अशी टीका देखील सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. ओबीसीचे राजकीय आरक्षण संपवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज निदर्शने केली. यावेळी माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी केंद्र सरकारवर ही टीका केली आहे.

'अशोक चव्हाणांची नारायण राणेंवर टीका'
मराठा आरक्षण प्रश्नावर गोलमेज परिषदेत नारायण राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. लवकरच मुंबई येथे मंत्रालयावर मोर्चा काढू, अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती. मात्र, राणे यांच्यावर मला बोलायचे नाही, अशा प्रकारचे वक्त्यव्य करणे राणे यांचे नेहमीचेच काम असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. आम्ही छत्रपती शाहू महाराजांचे अनुयायी या नात्याने सर्वसामान्यांचे काम करत राहू. शांततेच्या मार्गाने आमचा आवाज बुलंद करू, सामान्यांचे प्रश्न न्यायालयीन मार्गाने सोडवण्यासाठी आम्ही रस्त्यावर देखील उतरू, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी राणे यांच्यावर टीका केली आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अशोक चव्हाण यांनी पावडेवाडी नाका येथील पुतळ्याला अभिवान केले. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाबाबद केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत निदर्शने करण्यात आले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा -Taj Hotel : 'ताज'मध्ये बॉम्ब ठेवल्याचा कॉल लहान मुलाने केल्याचे उघड; कराडमधील मुलाची चौकशी सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details