नांदेड - जसा काळ बदलला तसा कालांतराने आपल्यात बदल करून घेतला तरच स्पर्धेत टिकू शकाल त्यासोबत स्पर्धा करू शकाल. हेच जाणून घेऊन आता टपाल खात्यातही अनेक बदल जाणवू लागले आहेत. आपल्याला प्रत्यक्ष घरी येऊन सेवा देणारा पोस्टमन आता बँकिंग सेवा घरपोच सेवा देत आहे. निराधाराच्या घरी, शेतकऱ्याच्या बांधावर तर रुग्णांच्या बेडवर सेवा देणारी यंत्रणा नांदेडच्या पोस्ट खात्याने उपलब्ध करून दिली असून जिल्ह्यात बँकिंग सेवेमध्ये क्वचितच असे पाहायला मिळते.
अधिक माहिती देताना नांदेड भारतीय डाक विभागाचे अधिकारी भागवत मुंडे पोस्ट ऑफिस 1854 सालापासून ग्राहकांच्या सेवेत...पोस्ट ऑफिस हे 1854 सालापासून ग्राहकाच्या सेवेत आहे. यामध्ये टपाल सेवे बरोबरच बँकिंग सेवा पण चांगल्या प्रकारे देत आहे. जवळपास ७०० च्या वर कर्मचारी शहरी भागासह ग्रामीण स्तरावरही सेवा देतात. बँकीग सेवेमध्ये 7 लाख 58 हजार 535 ग्राहक जोडले असून सेव्हिंग अकाऊंट काढण्यात आले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सेव्हिंग स्कीम देण्यात आल्या असून वरिष्ठ नागरिकांना तिमाही व्याज मिळते. तसेच मुलींसाठी 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' यासाठी सुकन्या समृध्दी योजना कार्यरत आहे.
कोविडच्या प्रादुर्भावात निराधाराना 25 कोटीचे घरपोच वाटपबँकिंग सेवा चांगल्या प्रकारे देण्यासाठी 1 सप्टेंबर 2018 ल इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरू झाली. त्यामार्फत आधार एनाबल पेमेंट सिस्टम, निराधार योजना तसेच स्कॉलरशिप वाटप, डिजिटल लाईफ प्रमाणपत्र आदी सेवा ग्रामस्तरावर उपलब्ध आहेत. कोविडच्या परिस्थितीत बँकेत येऊनही सेवा मिळत नव्हती. त्या परिस्थितीत निराधाराना त्यांच्या गावात जाऊन घरपोच सेवा पोस्ट बँकेने दिली आहे. जवळपास 25 कोटी 19 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. तसेच आधारकार्ड द्वारे वाटप 12 कोटी 19 लाख रुपयाचे वाटप करण्यात आले. तसेच पोस्ट ऑफिसमध्ये इन्शुरन्स सेवाही दिली जाते.