महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इसापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ; पैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - पैणगंगा नदी

धरणामध्ये प्राप्त रिपोर्टनुसार सध्या ७८. ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून इसापूर प्रकल्प प्रशासनाकडून कार्यक्षेत्रातील तहसील कार्यालयाला पत्र पाठवून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

इसापूर धरण
इसापूर धरण

By

Published : Aug 24, 2021, 3:58 AM IST

Updated : Aug 24, 2021, 4:18 AM IST

नांदेड - इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेला दमदार पाऊस व क्षेत्रातील जयपूर बंधारा व कोराडी मध्यम प्रकल्पातून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग पाहता इसापूर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. धरणामध्ये प्राप्त रिपोर्टनुसार सध्या ७८. ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून इसापूर प्रकल्प प्रशासनाकडून कार्यक्षेत्रातील तहसील कार्यालयाला पत्र पाठवून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

इसापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ
धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस

इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दिवसात झालेल्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरणामध्ये ४३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यानंतर झालेल्या दमदार पावसामुळे इसापूर धरणाच्या पाणी साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या पेण गंगा नदीवरील पहिला मोठा प्रकल्प असलेल्या पेण टाकळी प्रकल्पात सद्यस्थितीत केवळ ३६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर त्याच्या बाजूला असलेल्या जयपूर बंधारा व कोराडी मध्यम प्रकल्प हा पूर्णक्षमतेने भरला गेला आहे.

धरणात ७८.७५ टक्के पाणीसाठा

धरणामधील पाणी पातळी ४३८.६२ मीटर असून एकूण पाणीसाठा १०४४.०७ दलघमी, उपयुक्त पाणीसाठा ७४९.२८ दलघमी एवढा आहे. धरणांमधील पाण्याची टक्केवारी ७८.७५ टक्के इतकी झाली आहे. मागील २४ तासात ८.५१ द.ल.घ.मी. पाण्याची आवक झाली असून एक जून पासून पाणलोट क्षेत्रात ६२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

धरणात येणाऱ्या पाण्याचा जोर पाहता इसापूर धरणाच्या मंजूर जलाशय प्रचालन आराखड्यानुसार ( ROS ) ( ९ ० टक्के विश्वासहर्ता ) नुसार ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत धरणाची पाणी पातळी ४४०, ८२ मीटर ठेवावी लागणार आहे. त्यामुळे पुढील काळात धरणाची सुरक्षितता पाहता धरणात येणारे अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडावे लागणार आहे. नदी काठच्या गावावरील नागरिकांना पूर्वसूचना देण्याकरिता इसापूर प्रकल्प प्रशासनाकडून कार्यक्षेत्रातील पुसद, उमरखेड, महागाव, कळमनुरी, हदगाव, हिमायतनगर, माहूर व किनवट येथील तहसीलदारांना पत्र पाठवून पूर्वसूचना देण्यात आली, असल्याची माहिती इसापूर धरण पूरनियंत्रण तथा उपविभागीय अभियंता एच. एस. धुळगुंडे यांनी दिली आहे.

हेही वाचा -बंद उद्योगांचे होणार पुनरुज्जीवन; विशेष अभय योजनेंतर्गत राज्य सरकार देणार व्याजमाफी, असा करा अर्ज

Last Updated : Aug 24, 2021, 4:18 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details