नांदेड - येथे एका बड्या नेत्याचे निकटवर्तीय असणाऱ्या दिनेश बाहेती व विजय येवनकर यांच्या घर व कार्यालयावर आयकर खात्याकडून शनिवारी दुपारपासून धाड टाकत सर्च ऑपरेशन करण्यात आले.
हेही वाचा -UPSC : नांदेडच्या पोलीस पुत्र 'रजत'ला दुसऱ्या प्रयत्नात 'सुवर्ण' यश, ६०२ रँकिग
नांदेड शहरातील आयटीआय परिसरातील व आनंद नगर येथील बड्या नेत्याच्या निकटवर्तीयांच्या घर व कार्यालयाची आयकर खात्याकडून झडाझडती घेण्यात येत आहे. विजय येवनकर व दिनेश बाहेती हे एका सिमेंट एजन्सीचे व्यावसायिक भागिदार असून विजय येवनकर हे नांदेड महापालिकेच्या विद्यमान महापौर यांचे पती आहेत. सदर सर्च ऑपरेशन नांदेड शहरातील आयटीआय परिसरातील विष्णू कॉम्प्लेक्स व आनंद नगर येथील राजमॉल स्थित ऑफिससवर चालू आहे. यात सदर विभागाच्या दोन टीम अंतर्गत हे सर्च ऑपरेशन सुरू आहे. ज्यात संबंधित कार्यालयाच्या बाहेर मुंबई पासिंग असणाऱ्या गाड्या व पोलिसांची वर्दळ पहावयास मिळत आहे. त्यामुळे, संपूर्ण शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.