महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढणार - सोयाबीन क्षेत्र वाढणार

यंदा सोयाबीनला सुरूवातीपेक्षा दुप्पट भाव मिळत आहे. सुरूवातीच्या टप्प्यात शेतकर्‍यांना शासनाने जाहीर केलेला हमीभावा 3 हजार 880 रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमीत कमी 3 हजार 200 ते जास्तीत जास्त 4 हजार 100 रुपये प्रतिक्विंटला व्यापार्‍यांकडून भाव दिला जात होता.

यंदा सोयाबीन क्षेत्र वाढणार

By

Published : Apr 27, 2021, 5:24 PM IST

नांदेड - सोयाबीनला हमीभावापेक्षा दुप्पट म्हणजे आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. आत्तापर्यंतचा हा दर सर्वाधिक उच्चांक दर आहे. दरम्यान, खाद्यतेलाच्या किंमती वाढल्याने मागील दहा ते बारा दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नवा मोंढा बाजारपेठेत सोयाबीनचे दर वाढत असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र, शेतकर्‍यांकडे सोयाबीन उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. दर वाढीमुळे यंदा सोयाबीनचा पेरा वाढणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दिवाळीनंतरच शेतकऱ्यांनी सोयाबीनची केली विक्री

दिवसेंदिवस खाद्य तेलांच्या किंमतीत वाढ होत आहे. तसेच कुक्कुट पालनात खाद्य म्हणून वापरण्यात येणारी सोयाबीनच्या दिवसीचेही (चोथा) भाव वाढले आहेत. त्यामुळे यंदा सोयाबीनला सुरूवातीपेक्षा दुप्पट भाव मिळत आहे. सुरूवातीच्या टप्प्यात शेतकर्‍यांना शासनाने जाहीर केलेला हमीभावा 3 हजार 880 रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमीत कमी 3 हजार 200 ते जास्तीत जास्त 4 हजार 100 रुपये प्रतिक्विंटला व्यापार्‍यांकडून भाव दिला जात होता. त्यामुळे दिवाळीनंतर बहुतांश शेतकर्‍यांनी सोयाबीनची विक्री केली होती.

बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता

यंदाही सोयाबीनला बऱ्यापैकी भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी कापसाऐवजी सोयाबीनची पेरणी करतील असा अंदाज असून खरीपामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे. सोयाबीनचे क्षेत्र वाढेल अशी शक्यता लक्षात घेऊन बियाण्यांमध्ये व्यापारी कृत्रिम तुटवडा करतील. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शिवाय प्रशासकीय पातळीवर नियोजन व्हावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details