नांदेड -आज शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसाठी कोरोनाची अँटीजन टेस्ट किटद्वारे तपासणी करूनच सभागृहामध्ये प्रवेश देण्यात आला. यात एका सभापतींसह एकूण ८ जण बाधीत आढळून आले आहेत. यात अधिकारी, कर्मचारी आणि तीन जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे.
सर्वसाधारण सभेत जाताना केली अँटीजन टेस्ट-
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शासनाच्या कोरोनाविषयक नियमांचे पालन करूनच व्हावी, यासाठी कोविड -१९ ची तपासणी करूनच सभागृहात प्रवेश दिला गेला. सभा सुरू होण्यापुर्वी १३० जणांची तपासणी करण्यात आली. यात जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समिती सभापतींसह अधिकारी, कर्मचारी व तीन जिल्हा परिषद सदस्य, असे एकूण ८ जण पॉझिटिव्ह आठळून आले आहेत.
एकीकडे सभा तर दुसरीकडे अँटीजन टेस्ट-
अँटीजन टेस्ट किटद्वारे तपासणी सुरू होती. एकीकडे सभागृहात सर्वसाधारण सभा व दुसरीकडे सभागृहाच्या गेटवर तपासणी, असे चित्र दिसून आले.
रिक्त पदे भरण्याची मागणी-
दरम्यान जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीसह विविध विषय समित्यांवरील सदस्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात आली. यावरून सदस्या शिलाताई निखाते व समाधान जाधव यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
नांदेडामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेपुर्वी तपासणीत आठ जण पॉझिटिव्ह - corona case in nanded
आज शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसाठी कोरोनाची अँटीजन टेस्ट किटद्वारे तपासणी करूनच सभागृहामध्ये प्रवेश देण्यात आला.
जिल्हा परिषद नांदेड