नांदेड - एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. बालक आश्रमातील अधीक्षकानेच माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील आस्था बालक आश्रमातील हा प्रकार आहे.
संतापजनक! आश्रम शाळेतील मुलीवर अधीक्षकानेच केला अत्याचार
एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. बालक आश्रमातील अधिक्षकानेच माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील आस्था बालक आश्रमातील प्रकार आहे.
कुंपणानेच खाल्ले शेत..!
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहरात आस्था बालक आश्रमातील अधीक्षकानेच मुलीवर अत्याचार केला आहे. तशी रीतसर तक्रार मुदखेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ज्या विश्वासाने मुलींना अनाथ आश्रमात दाखल करण्यात येत. त्या विश्वासाला तडा देण्याचं काम आश्रम शाळेतील प्रशासनाने केले आहे. अधीक्षकाच्या त्रासाला कंटाळून मुलींवर पलायन करण्याची वेळ आली आहे.
अत्याचाराला कंटाळून आश्रम शाळेतून पीडित मुलींचे पलायन-
आश्रम शाळेलतील अधीक्षकाकडून सुरू असलेल्या क्रुर कृत्याने पीडित मुली कंटाळल्या होत्या. मागील अनेक दिवसांपासून लैंगिक छळाची मालिका सुरू होती. मात्र या मुलींना सांगायला किंवा ऐकायला कुणीही तयार नव्हतं. यामुळे पीडित मुलीने एका मैत्रिणीला घेऊन पलायन करण्याचा निर्णय घेतला. पीडित मुलगी आणि तिची मैत्रीण या दोघींनी 26 फेब्रुवारी रोजी आश्रम शाळेतून पळ काढला.
किनवट पोलिसांच्या सतर्कतेमुळे घटनेचा उलगडा-
मुदखेड रेल्वे स्थानकावरून आदीलाबादकडे निघालेल्या रेल्वेत पीडित आणि तिची मैत्रीण बसली. मात्र संशयित रित्या फिरणाऱ्या मुलींना किनवट स्थानकावरील रेल्वे पोलिसांनी त्यांची विचारपूस केली. यावेळी पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. या मुलींना रेल्वे पोलिसांनी किनवट पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर किनवट पोलिसांनी मुदखेड पोलिसांकडे विचारपूस करून त्यांच्या स्वाधीन केलं.
मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-
मुदखेड पोलिसांनी पीडित मुलीला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. आश्रम शाळेतील अधीक्षकानेच अत्याचार केल्याचा जवाब या अल्पवयीन मुलींनी दिला आहे. त्यानुसार विनयभंग आणि पोस्को कायद्या अंतर्गत आरोपी अधिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी दिली आहे.