नांदेड - एकीकडे सर्वत्र पावसाळ्याला सुरुवात झाली पण, जिल्ह्यात अद्यापही मोठा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा मोठ्या पावसावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांची शेतीची मशागत पूर्ण होवून पेरणीयोग्य जमीनही तयार झाली. पावसाची प्रतिक्षा करीत असताना सर्वसाधारण पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून अद्यापही ते मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
गेली तीन महिने उन्हाच्या कडाक्यामूळे त्रस्त झालेले नागरिक पावसाची वाट पहात बसले होते. पावसाचा जून महीना संपत आला तरी येथे पावसाने हजेरी लावली नव्हती. अशा परिस्थितीत पेरणीसाठी पावसाची अत्यंत अवश्यकता असतानाच दि. २९ जूनपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. यात बऱ्यापैकी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सध्या शेतकरी शेतीतील मशागतीची कामे आटोपून पेरणीसाठी सज्ज झाला आहे. परंतू गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात होती. या पावसामुळे आजपर्यंत उष्णतेच्या उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे तर, शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील दि. 30 जून पर्यंतची पावसाची आकडेवारी