महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 1, 2020, 3:40 PM IST

ETV Bharat / state

नांदेडमध्ये शेतकऱ्यांना क्यार चक्रीवादळाची 51 कोटींची नुकसानभरपाई; पुढील आठवड्यापासून होणार वाटप

नांदेड जिल्ह्यात गेल्यावर्षी आलेल्या क्यार व महा या चक्रीवादळांमुळे काही प्रमाणात खरीप व मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता. याचाच परिणाम म्हणून नांदेड जिल्ह्यासाठी 50 कोटी 65 लाख रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध झाला आहे.

नांदेडमध्ये शेतकऱ्यांना क्यार चक्रीवादळाची 51 कोटींची नुकसानभरपाई मिळणार
नांदेडमध्ये शेतकऱ्यांना क्यार चक्रीवादळाची 51 कोटींची नुकसानभरपाई मिळणार

नांदेड : गतवर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये 'क्यार' व 'महा' या दोन चक्रीवादळांमुळे, अवकाळी पावसामुळे रब्बी व खरीप पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानी पोटी 51 कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. या अनुदानाचे पुढील आठवड्यात वितरण होणार आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात आलेल्या क्यार व महा या चक्रीवादळामुळे जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात खरीप व मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता. याचाच परिणाम म्हणून नांदेड जिल्ह्यासाठी 50 कोटी 65 लाख रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध झाला आहे.

तालुकानिहाय अनुदान

नांदेड -14 कोटी 28 लाख,
अर्धापूर - 5 कोटी 59 लाख,
मुदखेड - 3 कोटी 45 लाख,
कंधार - 4 कोटी 66 लाख,
लोहा - 8 कोटी 75 लाख,
देगलूर - 6 कोटी 45 लाख,
मुखेड - 4 कोटी 16 लाख,
नायगाव - 3 कोटी,
बिलोली - 2 कोटी 35 लाख,
धर्माबाद -1 कोटी 18 लाख,
किनवट - 2 कोटी 62 लाख,
माहूर -1 कोटी 45 लाख,
हिमायतनगर - 2 कोटी 1 लाख,
हदगाव - 4 कोटी 28 लाख,
भोकर - 2 कोटी 41 लाख,
उमरी -1 कोटी 83 लाख

असे एकूण 50 कोटी 65 लाख रुपयांच्या अनुदानाचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details