नांदेड - शहरात सलग तीन दिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्हा चांगलाच हादरून गेला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून एकही रुग्ण पॉझिटिव्ह न मिळाल्याने नांदेडकरासाठी दिलासादायक परिस्थिती आहे. बुधवारी सकाळी 57 अहवालांपैकी 53 अहवाल निगेटीव्ह आले होते. त्यांनतर सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 30 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. मागच्या दोन दिवसांपासून कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण न सापडल्याने प्रशासनावरील दडपणही थोडे कमी झाले आहे. ही नांदेडकरांसाठी दिलासा देणारी माहिती आहे.
नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 382 स्वॅब घेण्यात आले. त्यात 1 हजार 291 स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. 34 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तिघांचा कोरेानाच्या आजारामुळे मृत्यू झाला. चार कोरोनाग्रस्त पळून गेले असल्याने 27 जणांवर उपचार सुरु आहेत. खासगी रुग्णालयातील सर्वच्या सर्व चाळीस जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यातील सकाळी 19 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले होते. सायंकाळी 21 जणांचे अहवाल निगेटीव्ह निघाले आहेत. भोकर येथील 9 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. येथील नागरिकांचे ही स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंट भोसीकर यांनी दिली आहे.