महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये अवैध रेती वाहतूक... एक कोटींचा मुद्देमाल जप्त - nanded latest news

नांदेड शहरालगत परिसरातून गोदावरी नदी पात्रातून आशा प्रकारे रेती उपसा होत असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकऱ्यांना मिळाली होती. या माहितीद्वारे पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांनी एक पथक नेमून घटनास्थळ गाठले.

illegal-sand-transportation
illegal-sand-transportation

By

Published : May 12, 2020, 12:46 PM IST

नांदेड- लॉकडाऊनच्या काळातही अवैधरित्या राजरोसपणे रेती वाहतूक सुरू आहे. भरदिवसा गोदापात्रातून रेती चोरी करुन अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत कोटी किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

एक कोटींचा मुद्देमाल जप्त

हेही वाचा-चिंताजनक : रायगडच्या उरण तालुक्यात आतापर्यंत 56 कोरोनाबाधित; आज 27 नवीन रुग्ण आढळले

लॉकडाऊनच्या काळात महसूल आणि पोलीस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्ताच्या कामात व्यस्त आहेत. याचाच फायदा घेत नांदेड शहारतील रेती माफियांनी राजसोसपणे रेती वाहतूक सुरू केली आहे. भरदिवसा गोदापात्रातून जेसीबीच्या साह्याने मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू आहे. हजारो ब्रास रेती अवैधरित्या काढून विक्री होत आहे. यामुळे कोट्यवधी रुपयाचा शासनाचा महसूल बुडत आहे.

नांदेड शहरालगत परिसरातून गोदावरी नदी पात्रातून आशा प्रकारे रेती उपसा होत असल्याची गोपणीय माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकऱ्यांना मिळाली होती. या माहितीद्वारे पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांनी एक पथक नेमून घटनास्थळ गाठले. त्याठिकाणी चार टिप्पर, दोन हायवा ट्रक, असा एक कोटी किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी महसूल विभागाला माहिती देण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details