नांदेड -रामतीर्थ गोदावरी नदीतील काळी वाळू तसेच मांजरा नदीतील लाल वाळूची अवैध वाहतूक करणारे सहा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. संबंधित कामगिरी रामतीर्थ ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी केली आहे.
अवैध वाळू वाहतूक करणारे सहा ट्रक ताब्यात; वाळू तस्कर 'रडारवर' - nanded crime news
रामतीर्थ गोदावरी नदीतील काळी वाळू तसेच मांजरा नदीतील लाल वाळूची अवैध वाहतूक करणारे सहा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. संबंधित कामगिरी रामतीर्थ ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी केली आहे.
अवैध रेतीची तस्करी करणारे सहा ट्रक ताब्यात; वाळू माफिया 'रडारवर'
संबंधित घटना पहाटेच्या सुमारास नरसी पोलीस चौकी परिसरात घडली. हे ट्रक उमरी तालुक्यातील बिजेगावमधून वाळू घेऊन जात होते. सोमनाथ शिंदे यांनी ट्रकची पाहणी केल्यानंतर त्यांना गोदावरी नदीतील वाळू आढळली. यानंतर हे ट्रक ताब्यात घेण्यात आले.
याव्यतिरिक्त मांजरा नदी पात्रातील लाल वाळू घेऊन जाणारा एम.एच 40 बीएल 3681 हा ट्रक गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी कारवाईसाठी ताब्यात घेतला आहे.