नांदेड - जिल्ह्यातील धर्माबाद येथे सध्या अवैध झटपट लॉटरीचा धंदा खुलेआम सुरू आहे. त्यामुळे शहरातील तरुणांसह मोलमजुरी करणाऱ्या तसेच मध्यमवर्गीय लोकांना लॉटरीचे वेड लागले आहे. या लॉटरीच्या नादात तरुणपिढी बरबाद होत चालली आहे. मात्र, याकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
धर्माबादेत अवैध झटपट लॉटरीचा खुलेआम धंदा, पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप - धर्माबाद पोलीस
अनेकांनी शहरातील नरेंद्र चौक, रेल्वे स्थानक परिसरात अवैध झटपट लॉटरीचे दुकाने थाटले आहेत. ही झटपट लॉटरी खेळण्यासाठी शेजारील राज्य असलेल्या तेलंगणा राज्यातून अनेक लॉटरी शौकीन धर्माबादेत येत असतात. तसेच शहरातील अनेक तरुण या झटपट ऑनलाईन लॉटरीच्या विळख्यात सापडले असून लॉटरीच्या नादात अडकून नशेच्या आहारी जात आहेत.
![धर्माबादेत अवैध झटपट लॉटरीचा खुलेआम धंदा, पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप illegal lottery center dharmabad nanded](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6043581-thumbnail-3x2-assd.jpg)
अनेकांनी शहरातील नरेंद्र चौक, रेल्वे स्थानक परिसरात अवैध झटपट लॉटरीचे दुकाने थाटले आहेत. ही झटपट लॉटरी खेळण्यासाठी शेजारील राज्य असलेल्या तेलंगणा राज्यातून अनेक लॉटरी शौकीन धर्माबादेत येत असतात. तसेच शहरातील अनेक तरुण या झटपट ऑनलाईन लॉटरीच्या विळख्यात सापडले असून लॉटरीच्या नादात अडकून नशेच्या आहारी जात आहेत. संबंधित ऑनलाईन लॉटरी शहरातील मध्यभागी असल्याने हे तरुण रस्त्याच्या मधोमध हुल्लडबाजी देखील करत असल्याचे प्रकार पाहायला मिळतात. तसे अनुभव देखील नागरिकांना आले असल्याचे नागरिक सांगतात. बिट जमादार व अधिकाऱ्यांना काहीतरी देऊन हा गोरख धंदा खुलेआम सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन हे अवैध धंदे तत्काळ बंद करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.