महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Illegal Gun Dealer Nanded : पाणीपुरी विक्रेता निघाला बंदूक विक्रेता; 2 गावठी बंदुकांसह 5 जिवंत काडतूस जप्त

Illegal Gun Dealer Nanded : ऐन सणासुदीच्या काळात नांदेड शहरात एका पाणीपुरी विक्रेत्या तरुणास दोन गावठी कट्टे आणि पाच जिवंत काडतूसांसह पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यानं मध्यप्रदेशमधून गावठी कट्टे आणि काडतूसं आणल्याची माहिती पोलीस तपासात समोर आलीय.

Illegal Gun Dealer Nanded
Illegal Gun Dealer Nanded

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 8:19 AM IST

माहिती देताना उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे

नांदेड : Illegal Gun Dealer Nanded : नांदेड शहरात मध्यप्रदेशमधून विक्रीसाठी आणलेले दोन गावठी कट्टे आणि पाच जिवंत काडतूसासह एका पाणीपुरी विक्रेत्या तरुणास पकडण्यात आलंय. ही कारवाई शिवाजीनगर गुन्हे शोध (Nanded Crime News) पथकानं केलीय. ऐन सणासुदीच्या काळात सतर्क राहून पोलिसांनी केलेल्या या कारवाईचं पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटेंनी कौतुक केलंय.

नवा मोंढा परिसरातून घेतलं ताब्यात : सणासुदीमुळं पोलिसांनी गस्त वाढवल्यामुळं शिवाजीनगर पोलिसांचे गुन्हे शोध पथक शिवाजीनगरच्या हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळाच्या स्थळांना भेट देत होते. यावेळी दत्तनगरमध्ये एक व्यक्ती गावठी कट्टे विक्री करण्यासाठी आला असून तो नवा मोंढा येथे थांबल्याची या पथकास माहिती मिळाली. तेंव्हा पथकानं आपलं वाहन नवीन मोंढा भागातील मार्केट कमिटीच्या मागं नेलं आणि काही वेळ संशयितावर पाळत ठेवत संशयित तरुणास ताब्यात घेतलं. संजय लोकेंद्रसिंह परिहार (वय २६, रा. विल्हेटी ता. भांडेर जि. दतीया मध्यप्रदेश. सध्याचा पत्ता- प्रफुल्लनगर चिखलवाडी, भोकर) असं या संशयिताचं नाव आहे. याची पोलीस पथकानं झडती घेतली असता, त्याच्याजवळ दोन गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतूसं आढळून आली.

30 हजारांचा मुद्देमाल जप्त : या पाणीपुरी विक्रेत्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतूसांसह ३० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांच्या तक्रारीवरुन संजय परिहारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. शिवाजीनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचं वरिष्ठांकडून कौतूक करण्यात येतंय.

ABOUT THE AUTHOR

...view details