महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड : अवैध रेतीसाठा आढळल्यास त्याची माहिती प्रशासनास द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय बातमी

अवैध रेतीसाठ्याची माहिती संबंधित कार्यक्षेत्रातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांना तत्‍काळ कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

nanded latest news
नांदेड : अवैध रेतीसाठा आढळल्यास त्याची माहिती प्रशासनास द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

By

Published : May 28, 2021, 9:22 PM IST

नांदेड- नदीपात्रालगतच्‍या शेतजमिनीत किंवा इतर ठिकाणच्‍या शेतीजमिनी तसेच महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण भागात बांधकामाच्‍या ठिकाणी अवैध रेतीसाठे आढळल्यास अशा शेतकऱ्यांनी किंवा खासगी जमीन मालकांनी त्‍यांच्या जमिनीत केलेल्‍या अवैध रेतीसाठ्याची माहिती संबंधित कार्यक्षेत्रातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांना तत्‍काळ कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

रेतीसाठे केले तर कठोर कारवाई -

जिल्ह्यातील जप्‍त रेतीसाठ्याच्‍या लिलावाच्‍या अनुषंगाने करावयाची कार्यपद्धती निश्‍चीत करण्‍यात आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत लिलाव झालेला नसून कोणी जर नदीपात्रालगतच्‍या शेतीमध्‍ये मोठया प्रमाणात अवैध रेतीसाठे करीत असतील, तर त्यांच्या कठोर कारवाई करू, असे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी सांगितले.

खासगी मालमत्ताधारकावरही कारवाई होणार -

लिलाव झालेला नसतानासुध्‍दा बांधकामाच्‍या ठिकाणी रेती उपलब्‍ध होत असल्‍याने हे रेती अवैध उत्‍खनन व वाहतुकीद्वारे उपलब्‍ध होत असल्‍याची शक्‍यता आहे. महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बांधकामाच्‍या ठिकाणी रेतीसाठे आढळून येत आहे. मनपा, नगरपालिका, ग्रामीण भागात बांधकामाच्‍या ठिकाणी रेतीसाठा करत असताना अशी रेती ज्‍यांच्याकडून उपलब्‍ध करुन घेतली आहे, याबाबतची वैध पावती किंवा इतर सक्षम पुरावा संबंधित बांधकाम करणाऱ्या मालकाकडे असणे आवश्‍यक आहे. जर असा पुरावा संबंधित मालकाकडे नसेल, तर अशा खासगी जमीनधारकाविरुध्‍द महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियमा नुसार दंडात्‍मक कार्यवाही करण्‍यात येईल, असेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा - 'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट - एसटीच्या १३०० सुरक्षा रक्षकांना मिळणार थकीत वेतन

ABOUT THE AUTHOR

...view details