नांदेड : शाळकरी विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून पोषण आहार म्हणून मध्यांन्न भोजन दिलं जातं..त्यातही निकृष्ठ जेवण आणि घोटाळा झालेली अनेक उदाहरणे आपण पाहिलीयेत,मात्र शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना इडली-सांबर देणारी शाळा नांदेड जिल्यात चर्चेचा विषय ठरलीय,पाहुयात ई टिव्ही भारतचा हा खास वृत्तांत.
इडलीचा उपक्रम :दररोजचा मेनू दाळ खिचडी, वाटाणा खिचडी आहे. रोज एक ते एक पदार्थ खाऊन मुलांना कंटाळा येतो. यासंबंधी सर्व शिक्षकांशी चर्चा करून इडलीचा उपक्रम राबवण्यासाठी शिक्षकांनी होकार दिला असे शाळेच्या मुख्यध्यापिका संगीता बोटलावाड यांनी म्हटले आहे. आठवड्यातील दोन दिवस शनिवार व बुधवार मुलांना इडलीचा स्वाद दिला जातो. यासाठी लागणारे साहित्य तयार करण्यासाठीचे भांडे सर्वांच्या खर्चातून आणण्यात आले आहे. विशेष म्हणजे नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इडली दिली जाते.
मध्यांन्न भोजनात डोस्याचाही समावेश :कारल्याच्या राजर्षी शाहु माध्यमिक विद्यालयात इडली-सांबरची चर्चा आता जिल्हाभरात होऊ लागली आहे. आठवड्यातून बुधवारी शनिवारी इडली-सांबर विद्यार्थ्यांना दिली जाते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या उपक्रमाला संस्थेनेही साथ देत आर्थिक मदतही करत आहे. आता या विद्यार्थ्यांच्या मध्यांन्न भोजनात डोस्याचाही समावेश होणार आहे.