महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हैदराबादेतील पीडितेला न्याय मिळावा; नांदेड भाजपची मागणी - nanded bjp demand get justice hyderabad victims

पीडित महिलेसोबत नराधामांनी केलेल्या प्रकारावर सर्वच स्तरांवरून राग व्यक्त केला जात आहे. पीडितेसोबत तिच्यासोबत झालेल्या कृत्यावर न्याय मिळावा आणि अपराध्यांना मृत्युदंडाची शिक्षा मिळावी, या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.

Hyderabad victims get justice; Demand Nanded BJP to president of india
हैदराबादेतील पीडितेला न्याय मिळावा; नांदेड भाजपची मागणी

By

Published : Dec 1, 2019, 1:25 PM IST

नांदेड - हैदराबाद येथील महिला डॉक्टर हिच्यावर बलात्कार केल्यानंतर जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. या घटनेतील मारेकऱ्यांना फाशी देण्यात यावी, अशी मागणी येथील भाजप महिला पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा -तेलंगणा बलात्कार,खून प्रकरण; आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पीडित महिलेसोबत नराधामांनी केलेल्या प्रकारावर सर्वच स्तरांवरून राग व्यक्त केला जात आहे. पीडितेसोबत तिच्यासोबत झालेल्या कृत्यावर न्याय मिळावा आणि अपराध्यांना मृत्युदंडाची शिक्षा मिळावी, या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा -विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी लावले प्राध्यपकांचे मासिक वेतन सांगणारे फलक

तेलंगणा सरकारच्या गृहमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांची मानसिकता लक्षात येते. अपराधींना लवकरात लवकर शिक्षा करण्याऐवजी मृत महिला डॉक्टरवर संशय घेतला जातो. या घटनेमध्ये सर्व दोषींना लवकरात लवकर मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details