महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडच्या कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड घट, जिल्ह्यात केवळ 707 रुग्णावर उपचार सुरू - नांदेड कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड घट

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 34, कंधार 2, बिलोली 2, धर्माबाद 1 असे एकुण 39 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 40, भोकर तालुक्यात 1, अर्धापूर 3, मुखेड 3, नांदेड ग्रामीण 5, देगलूर 1, धर्माबाद 1, औरंगाबाद 1 असे एकूण 55 बाधित आढळले.

huge drop in number of corona patients in nanded
नांदेडच्या कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड घट

By

Published : Oct 28, 2020, 9:48 PM IST

नांदेड -जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांत प्रचंड घट झाली आहे. एकूण बाधितांची संख्या आता 18 हजार 956 एवढी झाली असून यातील 17 हजार 616 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण 707 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील 36 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 504 एवढीच आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 96.14 टक्के आहे.

बुधवार 28 ऑक्टोंबरला सायंकाळी 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 118 कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 94 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 39 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 55 बाधित आले. आजच्या एकुण 1 हजार 722 अहवालापैकी 1 हजार 583 अहवाल निगेटिव्ह आले. या अहवालात एकाही बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 504 एवढीच आहे.

बुधवारी केवळ 55 कोरोना बाधित

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 34, कंधार 2, बिलोली 2, धर्माबाद 1 असे एकुण 39 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 40, भोकर तालुक्यात 1, अर्धापूर 3, मुखेड 3, नांदेड ग्रामीण 5, देगलूर 1, धर्माबाद 1, औरंगाबाद 1 असे एकूण 55 बाधित आढळले.

जिल्ह्यात 707 बाधितांवर औषधोपचार सुरू

यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 154, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 215, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 48, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 23, हदगाव कोविड केअर सेंटर 5, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 8, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 14, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 21, मांडवी कोविड केअर सेंटर 2, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 8, लोहा कोविड केअर सेंटर येथे 13, मुदखेड कोविड केअर सेटर 6, माहूर कोविड केअर सेंटर 9, किनवट कोविड केअर सेंटर येथे 29, धर्माबाद कोविड केअर सेंटर 5, उमरी कोविड केअर सेंटर 1, कंधार कोविड केअर सेंटर येथे 7, अर्धापूर कोविड केअर सेंटर 8, भोकर कोविड केअर सेंटर 3, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 4, बारड कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालयात दाखल 120, हैदराबाद येथे संदर्भीत 2, औरंगाबाद येथे संदर्भीत 1 झाले आहेत.

सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 75, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 90, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 65 एवढी आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकूण घेतलेले स्वॅब- 1 लाख 10 हजार 48
निगेटिव्ह स्वॅब- 87 हजार 668
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 18 हजार 956
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 17 हजार 616
एकूण मृत्यू संख्या- 504
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 96.14 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-11
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 479
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 707
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले 36.

ABOUT THE AUTHOR

...view details