महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nanded Crime : प्रेमसंबंधामुळे मुलीचे ठरलेले लग्न मोडले; वडीलांनी काका, मामाच्या मदतीने केला पोटच्या लेकीचा खून - गळा आवळून खून

मुलीच्या प्रेमसंबंधामुळे ठरलेले लग्न मोडल्याने नांदेडमध्ये वडीलांनी काका, भाऊ, मामा यांच्या मदतीने मुलीचा खून केला. सर्व आरोपींना 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सूनवण्यात आली आहे. मुलीचा मृतदेह शेतात जाळला. त्यानंतर राख नाल्यात फेकली.

Nanded Crime
मुलीची हत्या

By

Published : Jan 28, 2023, 9:56 AM IST

नांदेड :नात्यातील तरुणासोबतच्या प्रेमसंबंधांमुळे मुलीची सोयरीक मोडली. यामुळे आपली गावात बदनामी होऊ नये म्हणून वडील, काका, भाऊ, मामा आणि एक चुलत भाऊ अशा पाच जणांनी मुलीचा २२ जानेवारीच्या रात्री ओढणीने गळा आवळून खून केला. पुरावा नष्‍ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेतात जाळून टाकला अन् राख नाल्यात फेकली. या घटनेचा कोणालाही संशय येऊ नये, म्हणून कुटुंबीय नेहमीसारखेच गावात वावरत होते. अखेर त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

दररोज शेतात जायचे :तरूणी बीएएमएसचे शिक्षण घेत होती. दिवाळीनंतर तिचे लग्न ठरले होते. पण गावातील नात्यातील एका तरूणासोबतच्या प्रेम संबंधांमुळे सोयरीक मोडली गेली. यामुळे आपली गावात बदनामी झाली, या कराणामुळे वडील, भाऊ आणि इतर नातलगांनी मिळून रात्री घरातच गळा आवळून खून केला. यावेळी सगळ्यांनी दारू पिली होती. आरोपींना काल ( दि. 27 शुक्रवारी ) कोर्टात हजर करण्यात आले. सर्व आरोपींना 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सूनवण्यात आली आहे.



प्रियकाराने सोयरीक मोडली : गावच्या ठिकाणी शेती हे बहुतांश लोकांचे उपजीविकेचे साधन आसते. मृत तरूणीचे वडील हे मध्यमवर्गीय शेतकरी होते. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचे लग्न झाले. तिला गावातच देण्यात आले. मृत तरूणी फारशी गावी येत नव्हती. तसेच कुटुंबीयही फारसे गावात मिसळत नव्हते, असे ग्रामस्थांमधून सांगण्यात आले. मागील दीड वर्षापासून मृत तरूणीचे नात्यातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. तोही गावात राहत होता. नांदेड येथे सीएकडे तो नोकरी करत होता. या दोघांच्या प्रेमाला जोगदंड कुटुंबीयांचा विरोध होता. शुभांगीची नात्यातील एका मुलासोबत जुळलेली सोयरीकही तिच्या प्रियकाराने मोडली होती.

गळा आवळून खून : कुटुंबाची बदनामी होईल याची चिंता जनार्दन लिंबाजी जोगदंड यांना होती. त्यामुळे त्यांनी, तरूणीचे काका, भाऊ, मामा आणि एक चुलत भाऊ यांना सोबत घेऊन २२ जानेवारीच्या रात्री घरात ओढणीने गळा आवळून खून मुलीचा खून केला. घडलेला प्रकार कुणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून मृतदेह घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात नेऊन जाळला. चार दिवसांपर्यंत या घटनेची माहिती कुणालाही लागली नाही.


मोठ्या बहीणीलाही कुणकुण नाही : मुलीचा खून केल्यानंतर तिचे वडील, दोन भाऊ व मामा असे पाचही जण शेतातच मुक्कामी होते. उजाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी २३ जानेवारीला तिची राख शेतापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नाल्यात टाकली. आपल्या वागण्यातूनही कोणालाही संशय येऊन नये म्हणून हे सर्वजण गावात नेहमीप्रमाणेच वावरत होते. त्यांची दुसरी मुलगी गावात राहत असून तिलाही या घटनेची साधी कुणकुणही लागली नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

हेही वाचा :Pune Crime: लहान बहिणीशी अश्लील चाळे करणाऱ्या विवाहित बहिणीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details