महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाढत्या तापमानाचा 'फटका' केळी उत्पादकांना; केळी बागा करपल्या - केळी बाग

केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या अर्धापूर तालुक्यात वाढत्या तापमानामुळे, केळीच्या बागा वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून तापमान ४४ ते ४५ अंशादरम्यान पोहोचले होते. त्यामुळे केळीच्या बागेला पाणी दिले तरी, वाढलेल्या उनामुळे, केळीचे झाडे वाळत आहेत. गंभीर बाब म्हणजे, केळी झाडाच्या बुडाला ठिबकद्वारे पाणी सुरू असतानाही झाडाच्या वरच्या भागातील पाने करपू लागली आहेत. यामुळे लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

वाढत्या तापमानाचा 'फटका' केळी उत्पादकांना; केळी बागा करपल्या

By

Published : May 30, 2019, 2:38 PM IST

नांदेड - केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या अर्धापूर तालुक्यात वाढत्या तापमानामुळे, केळीच्या बागा वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून तापमान ४४ ते ४५ अंशादरम्यान पोहोचले होते. त्यामुळे केळीच्या बागेला पाणी दिले तरी, वाढलेल्या उनामुळे, केळीचे झाडे वाळत आहेत. गंभीर बाब म्हणजे, केळी झाडाच्या बुडाला ठिबकद्वारे पाणी सुरू असतानाही झाडाच्या वरच्या भागातील पाने करपू लागली आहेत. यामुळे लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

वाढत्या तापमानाचा 'फटका' केळी उत्पादकांना पाहा स्पेशल रिपोर्ट...


केळी उत्पादकांना केळीच्या हवामान आधारित फळबाग विमा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर ज्या केळीच्या बागा उन्हाच्या तडाख्यातून वाचल्या आहेत, अशा बागांना मान्सूनच्या आगमनाची प्रतिक्षा आहे. केळीसाठी पाणी हा महत्त्वाचा घटक मानला जातो. एक जरी पाण्याची 'पाळी' चुकली तर केळीच्या बागा करपून जातात. यंदा मार्चपासून सूर्य आग ओकत आहे. केळीच्या बागा वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत.


पण अशाही परिस्थितीमध्ये बागा वाचवल्या तरी वाढत्या तापमानात केळी होरपळून जात आहेत. मोठ्या कष्टातून आणि खर्च करून उत्पादित केलेली केळी टिकेल की नाही, याची शाश्वती शेतकऱ्यांना नाही. लाखो रुपयांचा फटका यामुळे शेतकऱ्यांना बसणार आहे. फळबागांसाठी हवामान आधारित विमा योजना शासनाच्या वतीने राबवण्यात येतो. तो विमा तरी मिळेल, अशी आशा केळी उत्पादकांकडून व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details