नांदेड- नांदेडचे उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकरला अटक करा, असे आदेश उच्च न्यायालयाने सीआयडीला दिले आहेत. कृष्णूर इथल्या धान्य घोटाळ्याप्रकरणी वेणीकरला अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वेणीकर सापडत नसल्यास त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
हेही वाचा - अमित शाह, मुख्यमंत्री आज सोलापूर दौऱ्यावर; महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेत राहणार उपस्थित
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे महसूल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे. कोट्यवधी रुपयांचे शासकीय धान्य काळ्या बाजारात विकल्याचा गुन्हा गेल्यावर्षी जुलै महिन्यात दाखल झाला होता. त्यात आता सामाजिक कार्यकर्त्याने स्वतंत्र याचिका दाखल करून या प्रकरणाचा योग्य तपास करावा, अशी मागणी केली होती.