महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड : ऊसाच्या शेतात गांजाची लागवड; गुन्हा दाखल - ramtirth police station nanded

रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कांगठी शिवारातील ऊसाच्या पिकात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला. यामध्ये ८६ हजार २०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून, लागवड करणाऱ्यास ताब्यात घेतले आहे.

hemp cultivation
ऊसाच्या शेतात गांजाची लागवड

By

Published : Oct 20, 2021, 6:38 PM IST

नांदेड - रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कांगठी शिवारातील ऊसाच्या पिकात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १९ ऑक्टोबर रोजी कारवाई करुन ८६ हजार २०० रुपये किमतीचा गांजा जप्त करुन एकास ताब्यात घेतले.

८६ हजार २०० रुपये किमतीचा गांजा जप्त -

बिलोली तालुक्यातील कांगठी येथील व्यंकट नरवाडे यांच्या शेतात विनापरवाना एडीपीएस अॅक्टच्या तरतूदीचा भंग करुन ऊसाच्या उभ्या पिकात गांजाची लागवड केल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर पोलीस उपनिरीक्षक आशिष बोराटे, रामतीर्थचे सपोनि व्हि. डी. जाधव यांनी १९ ऑक्टोबर रोजी धाड टाकली. यामध्ये ८६ हजार २०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून, लागवड करणाऱ्यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा -VIDEO : 3 कोटी 45 लाख रुपयांचा गांजा जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details