नांदेड -उष्ण तापमानाने जिल्ह्यात उच्चांक गाठलेला असून, पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. आज जिल्ह्यातील ७३६ गावे तहानलेली आहेत. ५५२ बोअर व विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या असून, ७८ टँकर्ससुध्दा पाणीटंचाई दूर करण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. जिल्ह्याला सध्या भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असूण टँकची संख्या वाढविण्याची गरज आहे.
नांदेड जिल्ह्यात तहानलेली गावे ७३६ ; पाणी पुरवठा मात्र ७३ टँकरद्वारे - villege
नांदेड जिल्हा टँकर मुक्तीकडे वाटचाल करीत असताना जिल्ह्यातील ६६ गाव व वाडेतांड्यावर ७३ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करीत आहेत.
नांदेड जिल्हा टँकर मुक्तीकडे वाटचाल करीत असताना जिल्ह्यातील ६६ गाव व वाडेतांड्यावर ७३ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करीत आहेत. सर्वाधिक म्हणजे ५० टँकर एकट्या मुखेड तालुक्यात असून त्यापाठोपाठ नांदेड तालुक्याचा नंबर लागतो. नांदेड तालुक्यात १५ टँकर आज सुरू आहेत. हदगाव ३, देगलूर २, तर भोकर, उमरी, हिमायतनगर, लोहा या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे टँकर सुरू आहेत. तर हदगाव ४, देगलूर व किनवट तालुक्यातील प्रत्येकी २ याप्रमाणे टँकर सुरू आहेत. तसेच जिल्ह्यातील ५१९ गावे आणि ३३ वाडी तांड्यावर विहीर आणि बोअरचे अधिग्रहण करण्यात आले. येणाऱ्या काळात नांदेड जिल्ह्याला अजून यापेक्षाही भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान गुरुवारी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या आणि त्यावर सुरू असलेल्या उपाययोजनांच्या कामाचा आढावा घेतला.