नांदेड - वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसाने नांदुसा गावाच्या शिवारात प्रचंड नुकसान झाले आहे. नांदुसा शिवारातील केळी, ऊस आणि इतर फळबाग वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडले आहेत. गावातील अनेक घरांचे पत्रे उडून घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यामुळे नांदुसा, कामठा गावातील अनेक संसार उघड्यावर आले आहेत. अचानक आलेल्या या वादळामुळे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. घरावरील पत्रे उडून परिसरातील केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पिकाचे अतोनात नुकसान केले आहे. अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागेचे मोठे नुकसान झाले. यात शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.