महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात अतिमूसळधार पाऊस, सर्व पिके पाण्याखाली; गुलाबी वादळाचा फटका - The effect of the pink storm

जिल्ह्यात सर्वत्र अतिमूसळधार पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक छोट्या-मोठ्या नद्यांना महापूर आला आहे. शेत-शिवारासह अनेक गावातही पाणी शिरले आहे. यामुळे अर्धापूर तालुक्यातील शेलगाव, पिंपळगाव, सांगवी, मेंढला, शेणी या गावांचा संपर्क तुटला आहे. तर काढणीस आलेल्या शेतकऱ्यांचे कापणीस आलेले सोयाबीन पुर्णपणे जमीनदोस्त झाले आहे.

नांदेड जिल्ह्यात अतिमूसळधार, सर्व पिके पाण्याखाली.
नांदेड जिल्ह्यात अतिमूसळधार, सर्व पिके पाण्याखाली.

By

Published : Sep 28, 2021, 10:48 AM IST

नांदेड - गुलाबी वादळाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यात सर्वत्र अतिमूसळधार पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक छोट्या-मोठ्या नद्यांना महापूर आला आहे. शेत-शिवारासह अनेक गावातही पाणी शिरले आहे. यामुळे अर्धापूर तालुक्यातील शेलगाव, पिंपळगाव, सांगवी, मेंढला, शेणी या गावांचा संपर्क तुटला आहे. तर काढणीस आलेल्या शेतकऱ्यांचे कापणीस आलेले सोयाबीन पुर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पैनगंगा नदीवरील इसापूर धरणाचे अकरा तर गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.

नांदेड जिल्ह्यात अतिमूसळधार पाऊस, ईटीव्ही भारतकडून आढावा

खरीप पिकासह बागायती पिकांना फटका

जिल्ह्यात गुलाबी वादळाचे काटे शेतकऱ्याचा अंगाला रुतले आहेत. नदीकाठच्या शेतजमीनी खरडून गेल्या आहेत. तर सोयाबीन, कापूस खरीप पिकासह हळद, केळी, ऊस बागायती पिकांनाही मोठा फटका बसला आहे. सततच्या होणाऱ्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदील झाला आहे.

जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी

नांदेड जिल्ह्यात रात्रीपासून सर्वदूर अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील धर्माबाद १५५, अर्धापूर १२९, सोनखेड १२८, कापशी ११७, बिलोली १०८, कलंबर १०५, मनाठा ९८, लोहा ९२, ऊमरी ९१, भोकर ८५, तामसा ७८, शेवडी ७६, नायगाव ६९, निवघा ६८, माळाकोळी ६३, हदगाव ६०, माहूर ४७, किनवट ३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

इसापूर धरणाचे अकरा दरवाजे तर विष्णूपूरी प्रकल्पाच्या नऊ दरवाज्यातून विसर्ग सुरू

आज इसापूर धरणाचे दि. 28 सप्टेंबर रोजी 08.00 वाजता गेट क्रमांक-4 व 12 (हे 2 गेट) 0.50 मिटर ने उघडण्यात आले आहेत. सद्यस्थितीत इसापूर धरणाच्या सांडव्याची 11 वक्रद्वारे (क्र.2,14,8,7,9,6,10,5,11,4,12) 50 से.मी.ने चालू असून पेनगंगा नदीपात्रात 532.090 क्युमेक्स (18791 क्युसेक्स) इतका विसर्ग सूरू आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले असून, तीन हजार 248 ने विसर्ग सुरू आहे. गेट क्रमांक 03, 05, 07, 14, 11, 06, 13, 01, 08 हे सध्या उघडण्यात आले आहेत. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे याबाबत निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी. असा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा -नांदेडात पुरामुळे शेतात पाणीच पाणी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून आर्थिक मदतीची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details